कोलकता 8 नोव्हेंबर: पश्चिम बंगलामध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी (WB politics) भाजप आणि तृणमूलमध्ये (BJP and trinamool ) जोरदार संघर्ष पेटला आहे. निवडणूक जशी जवळ येतेय तसं हा संघर्ष जास्त तीव्र होत आहे. तृणमूल गुंडगिरी करतेय असा आरोप भाजप वारंवार करत आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात येत असल्याचंही भाजपचं म्हणणं आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष डी. घोष यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना थेट धमकीच दिली आहे.
या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी थांबवावी नाहीतर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन. सुधारणा झाली नाही तर अशा गुंड कार्यकर्त्यांचे हात, पाय, डोकं फोडल्याशीवाय राहणार नाही. या कार्यकर्त्यांना घरी जाण्याऐवजी हॉस्पिटलमध्ये पाठवू.
यानंतरही त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर थेट त्यांना स्मशानातच पाठवू अशी धमकीच त्यांनी दिली. घोष यांच्या या वक्तव्यामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोनातून बरे झाल्यानंतर सगळ्यात पहिले 3 दिवस बंगालचा दौरा केला होता.
I tell Mamata di's people, who do mischief, to correct themselves within 6 months or else their hands, legs, ribs & heads will be broken - you'll have to go to hospital before being able to go home. If they increase mischief, they'll be sent to crematorium: D Ghosh, WB BJP chief pic.twitter.com/XyDKJ9LPra
— ANI (@ANI) November 8, 2020
राज्यात भाजप तब्बल 200 जागा मिळवेल असा विश्वास व्यक्त केला होता. भाजपने पश्चिम बंगालमध्ये प्रचंड ताकद लावली आहे. कुठल्याही स्थितीत तृणमूलचा गड उद्धवस्त करण्याची तयारी भाजपने केली आहे. पश्चिम बंगालवर डाव्यांची अनेक दशकांची पकड मोडून ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवली होती. तेव्हापासून बंगालमध्ये राजकीय कार्यकर्त्यांमधला संघर्ष हा तीव्र होता. यात अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.