अमेठी पाठोपाठ राहुल गांधींची वायनाडमधील उमेदवारी रद्द करण्याची मागणी

अमेठी पाठोपाठ राहुल गांधींची वायनाडमधील उमेदवारी रद्द करण्याची मागणी

अमेठी पाठोपाठ राहुल गांधी लढवत असलेल्या दुसऱ्या मतदारसंघातून म्हणजेच वायनाडमधून देखील त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • Share this:

वायनाड, 21 एप्रिल: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रात अपुरी माहिती दिल्यावरून अमेठीतून त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अमेठी पाठोपाठ राहुल गांधी लढवत असलेल्या दुसऱ्या मतदारसंघातून म्हणजेच वायनाडमधून देखील त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हे देखील वाचा: पंकजांची जीभ घसरली.. स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या राहुल गांधींना बॉम्बला बांधून पाठवायचं होतं

राहुल गांधी यांनी यंदा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरा मतदारसंघ म्हणून त्यांनी केरळमधील वायनाड या सुरक्षित मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघातील एनडीएचे उमेदवार टी. वेल्लापल्ली यांनी राहुल गांधींच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांनी वायनाडमधून दाखल केलेला अर्जाची वैधता तपासावी आणि तो अर्ज रद्द करावा अशी मागणी वेल्लापल्ली यांनी केली. यासाठी वेल्लापल्ली यांनी केरळचे मुख्य निवडणूक आयुक्तांकडे अर्ज केला आहे.

वाचा: पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे तर भारताची शस्त्र काय दिवाळीसाठी आहेत का? - मोदी

राहुल गांधी यांच्याकडे एका अन्य देशाचा पासपोर्ट आहे. याची माहिती त्यांनी अर्ज दाखल करताना दिली नसल्याचा दावा वेल्लापल्ली यांनी केला आहे. वेल्लापल्ली यांच्या वकीलाने राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांना राहुल गांधी यांच्या अर्जाचे तपासणी करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

अमेठीतील उमेदवारी संकटात

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. अमेठीमधील जिल्हाधिकारी कार्यालयात अपक्ष उमेदवार ध्रुवलाल आणि बहुजन मुक्ती पक्षाचे उमेदवार अफजल वारिस यांनी राहुल गांधींच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत त्यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे. ध्रुवलाल आणि वारिस यांनी घेतलेल्या आक्षेपानुसार राहुल गांधी यांनी अर्जावर जो स्टॅम्प लावला आहे तो दिल्लीचा आहे. प्रत्यक्षात तो अमेठीचा असला पाहिजे. तसेच राहुल गांधी यांनी शैक्षणिक पात्रतेबाबत हेरफेर आणि प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली नसल्याचा आरोप ध्रुवलाल यांनी केला आहे.

ध्रुवलाल आणि वारिस यांनी राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी भरलेल्या उमेदवारी अर्जात शैक्षणित पात्रतेबाबत पूर्ण माहिती दिली नाही. हा एक प्रकारचा धोका असल्याचे वारिस यांच्या वकिलांनी म्हटले आहे. इतक नव्हे तर प्रतिज्ञापत्रात स्थिर संपत्तीबाबतचा रकाना रिकामा सोडला आहे. राहुल यांनी एका कंपनीची नोंदणी करताना स्वत:ला ब्रिटनचे नागरिक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे ते भारतीय नागरिक नाहीत, असा दावा ध्रुवलाल यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी खोटी कागदपत्रे सादर करुन निवडणूक अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचे ध्रुवलाल यांनी म्हटले आहे. ध्रुवलाल आणि वारिस यांचे म्हणणे ऐकण्यासाठी जिल्हा निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना 22 एप्रिल रोजी 11 वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे.

VIDEO : राहुल गांधींवर टीका करताना पंकजा मुंडेंची जीभ घसरली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 08:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading