चेन्नईमध्ये भीषण पाणीसंकट; तामिळनाडूनं नाकारली केरळची मदत

चेन्नईमध्ये भीषण पाणीसंकट; तामिळनाडूनं नाकारली केरळची मदत

Water Shortage in Chennai : चेन्नईमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई आहे.

  • Share this:

चेन्नई, 21 जून : तामिळनाडूचं प्रमुख शहर असलेल्या चेन्नईमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई आहे. दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर जात असून प्रकरणं मारामारीपर्यंत गेलं आहे. पाण्यासाठी लोक आता हातघाईवर देखील उतरल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे. या साऱ्या परिस्थितीमध्ये केरळ सरकरानं तामिळनाडूला 20 लाख लिटर पाण्याची मदत केली. पण, तामिळनाडू सरकारनं मदतीची गरज नाही असं म्हणत मदत नाकारल्याचा दावा केरळ सरकारनं केला आहे. आठवड्याभरापासून चेन्नईमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. चेन्नईतील आयटी कंपन्यांनी तर कर्मचाऱ्यांना घरातून काम करा असे आदेश दिले आहेत. तर, गेस्ट हाऊस आणि हॉटेल्स देखील पर्यटकांना बुकिंगसाठी नकार देत आहेत. हॉटेल्स, रेस्टारंटमध्ये देखील पाण्याची परिस्थिती बिकट असून पाणी जपून वापरलं जात आहे. अशा स्थितीमध्ये केरळची मदत नाकारणं किती योग्य? असा सवाल केला जात आहे.

'पाक'ला हादरविणाऱ्या बालकोटच्या हवाई हल्ल्यांचं हे होतं नाव, पहिल्यांदाच खुलासा

काय म्हणाले स्टॅलिन?

दरम्यान, पाण्याच्या प्रश्नावर DMK प्रमुख एक. के. स्टॅलिन यांनी तामिळनाडू सरकारला केरळसोबत मिळून काम करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत. तर, दुसरीकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी शुक्रवारी होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चा करून योग्य तो तोडगा काढला जाईल असं म्हटलं आहे.

दरम्यान, चेन्नईला मदतीसाठी हात पुढे करण्यास तयार असल्याचं केरळच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. पण, आता मात्र वेगळाचा वाद दोन्ही राज्यांमध्ये निर्माण झाल्याचं पाहायाला मिळत आहे. दिवसेंदिवस पाण्याची गरज ही वाढत आहे. शिवाय, अपेक्षेप्रमाणे मान्सून देखील सक्रीय झालेला नाही. दरम्यान, आता शुक्रवारी होणाऱ्या बैठकीमध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

VIDEO: बिचुकलेसारख्या लोकांना चपलेनं मारलं पाहिजे, मेघा धाडे संतापली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2019 04:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading