या शहरात ऑफिसमध्ये नाही पाणी... कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश

या शहरात ऑफिसमध्ये नाही पाणी... कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश

मान्सूनचं आगमन झालं असलं तरी अजून महिनाभर तरी तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. चेन्नईजवळच्या महाबलिपुरममध्ये पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे इथल्या आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करायला सांगितलं आहे.

  • Share this:

चेन्नई, 13 जून : मान्सूनचं आगमन झालं असलं तरी अजून महिनाभर तरी तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. चेन्नईजवळच्या महाबलिपुरममध्ये पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे इथल्या आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करायला सांगितलं आहे.

अजून 100 दिवस या कंपन्यांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. चेन्नईमध्ये गेले 200 दिवस पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पाण्याची टंचाई जाणवते आहे.

टँकरच्या पाण्यावर भागवतायत तहान

महाबलिपुरममध्ये 12 आयटी कंपन्या आहेत आणि या आयटी कंपन्यांमध्ये 5 हजारपेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. ऑफिसमध्ये एवढे कर्मचारी असतील तर पाणी जास्त लागतं. ओएमआर भागात 600 आयटी कंपन्या आहेत. या कंपन्या टँकरच्या पाण्यावर कशीबशी गुजराण करत आहेत.

चेन्नईमध्ये 4 वर्षांपूर्वी जेव्हा टँकरचा संप झाला होता तेव्हाही कर्मचाऱ्यांना घरून काम करायलाच सांगण्यात आलं होतं.

घरून पाणी आणण्याच्या सूचना

घरून काम करणं शक्य नसेल तर कर्मचाऱ्यांनी घरून पिण्याचं पाणी आणायला सांगितलं जातं. चेन्नईच्या शोलिंगनल्लूर भागात एलकॉटमध्ये फोर्ड बिझनेस सर्व्हिसेसने कर्मचाऱ्यांना पिण्याचं पाणी घरून आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

काही कंपन्यांनी या पाणीटंचाईवर वेगळे उपाय काढले आहेत. ग्रीन एन्व्हायर्नमेंट या कंपनीचे सीईओ आणि सहसंस्थापक वरुण श्रीधरन यांनी सांगितल्यानुसार, त्यांची कंपनी 55 टक्के पाण्याचा पुनर्वापर करते.

विहिरींतून काढावं लागतं पाणी

चेन्नईमध्ये पाणीसंकट एवढं तीव्र झालं आहे की सिपकोट आयटी पार्कवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. या कंपन्यांना या भागातल्या 17 विहिरींतून पाणी काढावं लागतं. या विहिरींमधून 10 लाख लीटर पाणी काढलं गेलं. त्यामुळे कंपन्यांना टँकरचा आधार घ्यावा लागला.

==========================================================================================================

मुंबईकरांना पाण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: June 13, 2019, 6:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading