VIDEO: मुसळधार पावसामुळे पाणी घुसलं हॉस्पिटलमध्ये, रुग्णांचे होत आहेत हाल

VIDEO: मुसळधार पावसामुळे पाणी घुसलं हॉस्पिटलमध्ये, रुग्णांचे होत आहेत हाल

कोरोनामुळे आधीच सगळ्या हॉस्पिटल्सवर प्रचंड ताण येत आहे. डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहेत. त्यातच आता पावसाच्या पाण्यामुळे अडचणींमध्ये भरच पडली आहे.

  • Share this:

हैदराबाद 15 जुलै: तेलंगणाची राजधानी हैदराबादला मुसळधार पावसाने आज झोडपून काढलं. दिवसभर पावसाचा जोर एवढा होता की शहरातल्या अनेक भागात नाले तुडूंब भरून वाहू लागले. पाण्याचा निचरा होत नसल्याने शहरातल्या प्रसिद्ध उस्मानिया हॉस्पिटलमध्ये पाणी भरलं. जनरल वॉर्डमध्ये पाणी घुसल्याने रुग्णांच्या खाटा असलेल्या मोठ्या हॉलमध्ये पाणी शिरलं. सगळ्या हॉलमध्येच पाणी साचल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. तर त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना थांबायला जागाच राहिली नाही.

कोरोनामुळे आधीच सगळ्या हॉस्पिटल्सवर प्रचंड ताण येत आहे. डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहेत. त्यातच आता पावसाच्या पाण्यामुळे अडचणींमध्ये भरच पडली आहे. या सगळ्या रुग्णांना कुठे हलवायचं असा प्रश्न हॉस्पिटल प्रशासनासमोर आहे.

तर पावसाच्या पाण्यामुळे डास होण्याची शक्यता असून खोल्यांमध्ये गाळही साचल्याने इन्फेक्शनचा धोका निर्माण झाला आहे.

हैदराबादमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सरकारने अनेक भागात पुन्हा निर्बंध लादले आहेत. तर कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी काही शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मंत्रिंडळाची बैठक बोलावून परिस्थितीवर चर्चा केली.

राज्यात औषधांचा तुटवडा पडू देऊ नका असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पावसाळ्यात आजारांचं प्रमाण वाढत असल्याने अधिकाऱ्यांनी त्यासाठी तयारी करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

तर डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 15, 2020, 7:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading