पाणीटंचाईमुळे या गावात कुलूपबंद करून ठेवतात पाणी

महाराष्ट्रात धुवाँधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाण्याच्या एका थेंबाची किंमत काय असते याची आपल्याला जाणीव नसेल. पण वर्षाचे 12 महिने तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळ सोसणाऱ्या लोकांसाठी पाण्याचा एकेक थेंब महत्त्वाचा आहे. याच कारणामुळे राजस्थानमधल्या बारमेर जिल्ह्यातल्या एका गावात लोकांनी त्यांचे पाणीसाठे कुलूपबंद करून ठेवले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 07:01 PM IST

पाणीटंचाईमुळे या गावात कुलूपबंद करून ठेवतात पाणी

बारमेर, 2 जुलै : महाराष्ट्रात धुवाँधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाण्याच्या एका थेंबाची किंमत काय असते याची आपल्याला जाणीव नसेल. पण वर्षाचे 12 महिने तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळ सोसणाऱ्या लोकांसाठी पाण्याचा एकेक थेंब महत्त्वाचा आहे.

याच कारणामुळे राजस्थानमधल्या बारमेर जिल्ह्यातल्या एका गावात लोकांनी त्यांचे पाणीसाठे कुलूपबंद करून ठेवले आहेत. पाण्याची चोरी होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी केलेला हा उपाय.

भारत - पाक सीमेवरच्या वाळवंटी भागात काही तुरळक गावं आहेत. इथे राहणाऱ्या माणसांना सततची उष्णता आणि पाणीटंचाईची झळ सोसावी लागते. रमजान की गफन, आरबी की गफन, तमाची की गफन, लक्खे का तला, भीलों का तला, भुंगारिया, रासबानी अशा गावांमध्ये एक एक थेंब पाणी साठवावं लागतं. जसजशी तापमानात वाढ होते तसतशी पाण्याची समस्या तीव्र होत जाते.

उडत्या विमानातून खाली पडून एकाचा मृत्यू ! नेमका काय घडला प्रकार?

या गावांमध्ये पाण्याचे भूमिगत साठे करण्याची पद्धत आहेत. यासाठी विहिरीतून पाणी काढून ते हौदात ठेवलं जातं आणि मग या हौदाला कुलूप लावलं जातं. कधीकधी तर हा उष्मा एवढा वाढतो की टँकरने पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्यायच राहत नाही.

Loading...

पाण्यावरून भांडणं होऊ नयेत म्हणून पाण्याच्या कुलूपबंद हौदांवर पहारेकरीही बसवावे लागतात, असं इथले जुनेजाणते गावकरी सांगतात.

शहरांमध्ये कधीकधी पाईपलाईन फुटून लाखो लीटर पाणी वाया जातं तेव्हा वाळवंटातल्या गावांमधल्या या गावकऱ्यांची आठवण जरी झाली तरी महत्त्वाचं आहे.

=====================================================================================

VIDEO: तुंबलेलं पाणी दिसत नाही; मनसेकडून महापौरांना जाड भिंगाचा चष्मा भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 07:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...