मराठी बातम्या /बातम्या /देश /

क्रुरतेचा कळस! गंगा डॉल्फिनला रॉड, कुऱ्हाडीने जीवे मारतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल

क्रुरतेचा कळस! गंगा डॉल्फिनला रॉड, कुऱ्हाडीने जीवे मारतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल

गंगा डॉल्फिन माशाला मारल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या डॉल्फिनला मारणाऱ्या तीन ग्रामस्थांना अटक करण्यात आली आहे.

प्रतापगड, 08 जानेवारी: काही लोकांनी रॉड, कुऱ्हाड आणि काठीनं एका डॉल्फिन माशाला अत्यंत क्रुरतेनं मारलं आहे. मानवी क्रुरतेचा चेहरा दाखवणारा हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये बराच व्हायरल होताना दिसत आहे. हा डॉल्फिन मासा नदीच्या किनारी आला होता. स्थानिक लोकांच्या काही टोळक्यानं अगदी आसुरी आनंदानं या डॉल्फिनला जीवे मारलं आहे.

संबंधित धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील प्रतापगडजवळील एका गावातील येथील आहे. ही घटना प्रतापगडमधील नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरपतहा गावची आहे. ही घटना मागील आठवड्यात घडली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतरही प्रतापगड येथील नवाबगंज येथील पोलिसांनी संबंधित लोकांवर कोणतीही कारवाई केली नाही.

या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश द्विवेदी यांनी सांगितलं की, 'गंगा डॉल्फिन माशाला मारल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या डॉल्फिनला मारणाऱ्या तीन ग्रामस्थांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर वनजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'

आई शपथ! साडी नेसून मारला जिमनॅस्टिकचा फ्लिप, VIDEO पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

काही लोकं अत्यंत क्रुरपणे या माशाला मारताना दिसत आहेत. नदीच्या पाण्यात डॉल्फिनच्या शरीरातून रक्त वाहू लागल्यानंतरही लोकं त्याच्यावर वार करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही लोकांना डॉल्फिनला पकडून ठेवलं आहे. या व्हिडिओमध्ये एकजण "फालतू में क्यों मार रहे हो यार (तुम्ही विनाकारण डॉल्फिनला का मारत आहात यार)," असं म्हणताना दिसत आहे. पण ती लोकं थांबत नाहीत. लोकांच्या या आक्रमक हल्ल्यात या डॉल्फिनचा जागीच मृत्यू झाला आहे.

First published:

Tags: Uttar pradesh