• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • VIDEO : 3000 मृतदेहांचे शवविच्छेदन केलेल्या डॉक्टरांचा असा झाला धक्कादायक मृत्यू; नाचता-नाचताच घडलं असं

VIDEO : 3000 मृतदेहांचे शवविच्छेदन केलेल्या डॉक्टरांचा असा झाला धक्कादायक मृत्यू; नाचता-नाचताच घडलं असं

डॉक्टर जैन हे नाचताना अचानक कसे कोसळले हे या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते. यानंतर तेथे उपस्थित लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं, पण त्यांना वाचवता आलं नाही.

 • Share this:
  भोपाळ, 19 ऑक्टोबर : फॉरेन्सिक औषध तज्ज्ञ डॉ. सीएस जैन यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे (senior doctor got heart attack) निधन झाले. जैन हे डॉक्टर मित्रांसोबत पार्टीत नाचत होते. नाचत असतानाच काही क्षणात त्यांना हृदयविकाराचा झटका (heart attack) आला आणि ते जमिनीवर कोसळले. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. डॉक्टर जैन हे नाचताना अचानक कसे कोसळले हे या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते. यानंतर तेथे उपस्थित लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं, पण त्यांना वाचवता आलं नाही. डॉ. सीएस जैन हे भोपाळ शहरातील फॉरेन्सिक औषध तज्ज्ञ म्हणून नावाजलेले डॉक्टर होते. ही घटना रविवारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. जैन हे हॉटेल जहानुमा येथे आपल्या मित्रांसोबत पार्टीमध्ये डान्स करत होते. या पार्टीत अनेक नामवंत डॉक्टर उपस्थित होते. प्रत्येकजण चित्रपटगीतांच्या नादात डुलत होते. डॉक्टर सीएस जैनही तिथे नाचत होते. या दरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते काही क्षणातच खाली कोसळले. डॉ. जैन 1975 च्या बॅचचे डॉक्टर होते. ते शहरातील सर्वात जुने फॉरेन्सिक तज्ज्ञ होते. हे वाचा - Bigg Boss Marathi:घरात रंगणार’चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’कॅप्टन्सी टास्क; कोण होणार नवा कॅप्टन? अचानक घडलेल्या घटनेमुळे काहीकाळ कोणालाच काही समजलं नाही. नाचताना अचानक खाली कोसळल्यानंतर त्यांना त्यांच्या मित्रांनी ताबडतोब जवळच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांची मुलगी अमेरिकेत राहते. त्यामुळे त्यांचे अंतिम संस्कार आज मंगळवारी केले जाणार आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी तीन हजार मृतदेहांचे शवविच्छेदन केलं आहे. हे वाचा - 6 महिन्यांपासून पोटात होता मोबाईल; युवकाला कल्पनाही नव्हती, एक्सरे पाहून डॉक्टरही शॉक पार्टीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 16 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्व काही व्यवस्थित चालले असताना अचानक नाचताना डॉक्टर जमिनीवर कोसळतात. या पार्टीत 50 हून अधिक वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते, तरीही त्यांना वाचवता आलं नाही.
  Published by:News18 Desk
  First published: