ढील दे... काट! अमित शाहांचा जोरदार पतंगबाजीचा हा VIDEO एकदा पाहाच

ढील दे... काट! अमित शाहांचा जोरदार पतंगबाजीचा हा VIDEO एकदा पाहाच

देशाची गृहमंत्री अमित शाहा यांनी अहमदाबादमध्ये जाऊन पतंगबाजीची मजा लुटली. त्याचा हा VIDEO व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रियाही वाचण्यासारख्या आहेत.

  • Share this:

अहमदाबाद, 14 जानेवारी : संक्रांतीच्या निमित्ताने पतंग महोत्सवही असतो. संक्रांतीला पतंग उडवणं ही पारंपरिक प्रथाही आहे. विशेषतः गुजरामध्ये संक्रांतीला 'उत्तरायन' असंही म्हणतात आणि गुजराती घरांमध्ये पतंगबाजी संक्रांतीचा मोठा कार्यक्रम असतो. देशाची गृहमंत्री अमित शाहा यांनी अहमदाबादमध्ये जाऊन पतंगबाजीची मजा लुटली. त्याचा हा VIDEO व्हायरल झाला आहे.

अमित शाहा या व्हिडीओमध्ये जोरदार पतंगबाजी करताना दिसतात. हातातला मांजा पहिल्यांदा ढील देत पतंग उंचावर उडवतात आणि तितक्याच तडफेनं काटाकाटी करतानाही दिसतात.

अमित शाहांनी मांजाची ढील थांबवत योग्य वेळी पतंग खाली वर केल्यावर प्रेक्षकांनी जल्लोष केला.

गृहमंत्र्यांच्या या पतंगबाजीवर सोशल मीडियावर तात्काळ बऱ्या-वाईट प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. तिकडे CAA, NRC वरून देश पेटला आहे आणि इथे गृहमंत्री पतंगबाजीत दंग आहेत, अशी प्रतिक्रिया एका यूजरने नोंदवली आहे.

अमित शाहांनी असे किती पतंग गायब केलेत याचा कुणालाच पत्ता लागलेला नाही, अशी खोचक प्रतिक्रिया दुसऱ्या एका यूजरने दिली आहे.

राऊत नावाचा पतंग कापा, असा सल्लाही एका गुजराती यूजरने दिला आहे. तर अमित शाहा कसे ऑलराउंडर आहेत, असं कौतुक काहींनी केलं आहे.

अन्य बातम्या

NO CAA आणि NO NRC; मुंबई वानखेडे स्टेडियमच्या लाईव्ह सामन्यात निषेधाचा सूर

प्रकाश आंबेडकरांना धक्का, आनंदराज 'वंचित'मधून बाहेर!

नाराजी प्रकरणावर 'ठाकरे सरकार'मधल्या सर्वात पॉवरफुल मंत्र्याने दिली प्रतिक्रिया

First published: January 14, 2020, 6:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading