मराठी बातम्या /बातम्या /देश /

शेतकरी आंदोलनात या अनोख्या नागीण डान्सचा VIDEO VIRAL

शेतकरी आंदोलनात या अनोख्या नागीण डान्सचा VIDEO VIRAL

संतप्त शेतकऱ्यांनी आक्रोश करत उद्या 11 ते 3 भारत बंदचं (Bharat Bandh) आवाहन केलं आहे. कृषी बिल रद्द (Farmers Bill) करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.

नवी दिल्ली, 07 डिसेंबर : राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं तीन नव्या कृषी धोरण आणि नव्या कृषी कायद्यासंदर्भात जोरदार आंदोलन सुरू आहे. कुठे गाड्या अडवून तर कुठे गाणी, रात्री जागवून आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत केंद्र सरकारसोबत झालेल्या 5 बैठका म्हणाव्या तेवढ्या यशस्वी झाल्या नाहीत. कृषी बिल रद्द करण्यावर शेतकरी ठाम आहेत आणि याचसाठी आता शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन सुरू केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता म्हशीसमोर पुंगी वाजवली जात आहे. नागीण डान्सची धून या पुंगीतून वाजवत आहे. तर एकानं म्हशीच्या पाठीवर केंद्र सरकारचा बोर्ड ठेवला आहे. ही म्हैस म्हणजे केंद्र सरकार आणि गारूडी म्हणजे शेतकरी आणि त्यांच्या व्यथा या धूनमधून मांडत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी आक्रोश करत उद्या 11 ते 3 भारत बंदचं आवाहन केलं आहे. कृषी बिल रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. दिल्लीतील आंदोलनाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. इतकच नाही तर शिवसेनेनं देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्याचं खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीनेही या बंदला पाठिंबा दर्शवला असून नागरिकांनी बळीराजासाठी आंदोलनात सहभागी व्हावे, असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जनतेला केले आहे. शेतकरी आंदोलन आणि भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे एक दिवस मौनव्रत ठेवणार आहेत. या आंदोलनाला काँग्रेसनं देखील पाठिंबा दर्शवला आहे. पंजाब, हरियाणा तसंच उत्तर भारतातून शेतकरी राजधानीत एकवटले असून सरकार काय तोडगा काढणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
First published:

पुढील बातम्या