VIDEO: चिमुकल्यासाठी एका हातात रायफल अन् दुसऱ्या हातात दूधाचं पॅकेट घेऊन ट्रेनमागे धावला RPF जवान

VIDEO: चिमुकल्यासाठी एका हातात रायफल अन् दुसऱ्या हातात दूधाचं पॅकेट घेऊन ट्रेनमागे धावला RPF जवान

त्या महिलेचं बाळ उपाशी आहे. त्याला दूध मिळालेलं नाही आणि भूकेनं ते सतत रडत आहे.

  • Share this:

भोपाळ, 5 जून : अमेरिकन कॉमिक्सवर आधारित लोकप्रिय पात्र कॅप्टन अमेरिकाप्रमाणे आता भारतात एक RPF जवान कॅप्टन रेल्वे ठरला आहे. या जवानानं कर्तव्यासोबतचं माणुसकीला महत्त्व देत श्रमिक स्पेशल ट्रेनमधील प्रवासी मजूरांची मदत केली आहे. कॅप्टन रेल्वेचा हा किताब रेल्वे सुरक्षा बलाचे कॉन्स्टेबल इंदर सिंह यादव यांना देण्यात आला. त्यांनी एका महिलेला 4 वर्षीय मुलासाठी चालत्या ट्रेनमध्ये धावत जाऊन दुधाचं पॅकेट पोहोचवण्याचं कौतुकास्पद काम केलं आहे.

5 मे ला बेळगाववरून गोरखपूर जाणारी श्रमिक स्पेशल ट्रेन नंबर 06299 भोपाळ स्टेशनवर थांबली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 8.45 ला ही ट्रेन भोपाळ स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर उभी होती. त्यावेळी ड्यूडीवर असलेल्या कॉन्स्टेबल इंदर यांनी एक महिला हावभाव करुन काहीतरी सांगत होती. त्यांनी त्या महिलेला जाऊन विचारलं तेव्हा त्यांना समजलं की, त्या महिलेचं बाळ उपाशी आहे. त्याला दूध मिळालेलं नाही आणि भूकेनं ते सतत रडत आहे.

महिलेचं बोलणं ऐकून इंदर सिंह यादव धावत धावत दूधाचं पॅकेट आणण्यासाठी गेले. जोपर्यंत ते दूध घेऊन पोहोचत होते तोपर्यंत ट्रेन सुरू झाली होती. हे पाहिल्यावर त्यांनी त्या महिलेच्या कोचकडे धावायला सुरुवात केली. ट्रेनचा वेग वाढलेला होता. पण तरीही एका हातात सर्व्हिस रायफल आणि एका हातात दूधाचं पॅकेट घेऊन इंदर धावत त्या महिलेपर्यंत पोहोचले आणि त्यांनी तिला ते दिलं.

ग्वालियारचे राहणारे 33 वर्षीय इंदर सिंह यादव यांनी 2009 मध्ये RPF जॉइन केलं होतं. सुरुवातीच्या काळात ते लखनऊला कार्यरत होते. त्यानंतर मागच्या 5 वर्षांपासून ते भोपाळ येते आपलं कर्तव्य बजावत आहेत. आपल्या या कामातून त्यांनी दाखवून दिलं की वर्दी परिधान केलेल्या व्यक्तीकडेही माणुसकी असते.आपल्या कर्तव्याच्याही पुढे जाऊन हे काम करत त्यांनी नवा आदर्श घालून दिला आहे.

First published: June 4, 2020, 2:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading