मुंबई, 07 मार्च : असं म्हणतात ईश्वर दिसत नाही पण माणसात देव शोधावा. याची प्रत्यक्षात प्रचिती एका महिलेला आली आहे. तिने आपला अनुभव शेअर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही अश्रू अनावर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरस संदर्भात आज व्हिडीओ कॉलिंगवरून संवाद साधत असताना हा प्रसंग घडला आणि मोदी भावूक झाले. उत्तराखंड इथे राहणाऱ्या महिलेनं अंगावर शहारे आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या महिलेनं प्रत्यक्षात ईश्वराला पाहिलं नाही मात्र माणसातला देव पाहिल्याचं सांगितलं आहे.
'मोदीजी मी ईश्वराला पाहिलं नाही, पण मी तुम्हाला पाहिलं आहे. तुम्ही सुरू केलेल्या जन औषधांमुळेच आज माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. मला असणाऱ्या आजारासाठी लागणारी औषधं खूप महाग मिळत होती. त्यामुळे खाण्यासाठी माझ्याकडे पैसे उरत नव्हते. आपण सुरू केलेल्य़ा योजनेमुळे अर्ध्य पैशांमध्ये ही औषध मला सहज उपलब्ध होऊ शकली. डॉक्टरांनी मी बरं होण्याची आशाही सोडली होती. मात्र आज मी बरी आहे ती केवळ आपल्यामुळे. आपल्या या योजनेमुळे माझे खूप पैसे वाचले आणि मी चांगलं खाऊ शकते. त्यामुळे माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा होतं आहे. तुम्हीच माझे देव आहात'
या अर्धांगवायू झालेल्या महिलेचे उद्गार ऐकून पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर झाले.
This is Gold. PM Modi in tears after hearing the story of a beneficiary on Jan Aushadi Day. She says "I haven't seen God. But I see God in you" pic.twitter.com/xD9XkPS7CF
— Omkar Shetty🇮🇳 (@omkar_shettyg) March 7, 2020
उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या दीपा शाह यांना 2011 साली अर्धांगवायूचा झटका आला होता. यामुळे त्यांना नीटसं बोलताही येत नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या या योजनेमुळे त्यांना खूप फायदा झाला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना देवाची उपमा दिली. 'मी ईश्वराला पाहिलं नाही, पण मोदीजी मी तुम्हाला पाहिलंय' असं म्हणत या महिलेच्या डोळ्यातून अश्रुंचा बांध फुटला. महिलेनं पंतप्रधान मोदींना दिलेली देवाची उपमा आणि तिचा प्रसंग ऐकून पंतप्रधान मोदी भावूक झाले.