5 सेकंदात उद्ध्वस्त झाली समुद्र किनाऱ्यावरची 19 मजली इमारत, पाहा LIVE VIDEO

5 सेकंदात उद्ध्वस्त झाली समुद्र किनाऱ्यावरची 19 मजली इमारत, पाहा LIVE VIDEO

पोलिसांनी दोन दिवस आधी एक पत्रक जारी करून इमारत पडताना बाहेर कोणत्याही ठिकाणाहून पाहू शकता असं सांगितलं होतं.

  • Share this:

कोच्ची, 11 जानेवारी : कोची समुद्र किनाऱ्यावर उभाऱण्यात आलेल्या सर्व अनधिकृत बांधकामांना पाडण्याचे काम सुरू झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शनिवारी 19 मजली एच2ओ होलीफेथ अपार्टमेंट पाडण्यात आलं. फक्त यामध्ये 90 फ्लॅट होते. इतर कोणतीही हानी होऊ नये यासाठी भागात कलम 144 लागू करण्यात आले होते.

समुद्र किनाऱ्यावर बांधाकाम नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या दोन इमारती पाडण्याआधी परिसरात ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना इसारा दिला होता. हा परिसर धोकादायक असून कोणताही धोका प्रशासन पत्करू इच्छित नाही असं पोलिस महानिरीक्षक विजय सखारे यांनी म्हटलं होतं. यासाठी परिसरात 500 पोलिस कर्मचारी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू ठेवण्यासाठी 300 स्ट्रायकर दलांना कामाला लावले होते.

पोलिसांनी दोन दिवस आधी एक पत्रक जारी करून इमारत पडताना बाहेर कोणत्याही ठिकाणाहून पाहू शकता असं सांगितलं होतं. तसेच ज्या इमारती पाडायच्या आहेत त्यातील रहिवाशांना घर सोडण्यापूर्वी सर्व वीज उपकरणे बंद कऱण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच आजुबाजुच्या परिसरात घरांना धुळीपासून वाचवण्यासाठी खिडक्या आणि दरवाजे बंद करण्याचा सल्ला दिला होता.

छपाक Vs तानाजी, पहिल्या दिवशी कुणी केली जास्त कमाई?

एच2ओ होलीफेथ अपार्टमेंट, अल्फा सेरिन, जैन कोरल कोव्ह अपार्टमेंट, गोल्डन कोयालोरम या इमारती अनधिकृत बांधकामात असल्याचे आढळले होते. यामध्ये मिळून एकूण 343 फ्लॅट बांधण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर 2019 मध्ये या परिसरातील अनधिकृत बांधकाम 138 दिवसांच्या आत पाडण्याचे आदेश दिले होते.

जागा एक फलंदाज तीन! टीम इंडियातील भांडणामुळे भडकला कॅप्टन कोहली

Published by: Manoj Khandekar
First published: January 11, 2020, 1:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading