VIDEO : सुसाट होंडा सिटी कार झाली आऊट ऑफ कंट्रोल, काही सेंकदात झालं होत्याचं नव्हतं!

VIDEO : सुसाट होंडा सिटी कार झाली आऊट ऑफ कंट्रोल, काही सेंकदात झालं होत्याचं नव्हतं!

एका भरधाव कारने दोन सायकलस्वार, कार आणि रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारला जोरात धडक दिली

  • Share this:

यमुना नगर, 12 जानेवारी : हरियाणा जिल्ह्यातील यमुनानगरमध्ये शनिवारी मनात धडकी भरवणारीएक अपघाताची घटना घडली. एका भरधाव कारने दोन सायकलस्वार, कार आणि रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारला जोरात धडक दिली. या अपघातात 5 जण जखमी झाले आहे. अपघातानंतर कारचा ड्रायव्हर फरार झाला आहे.

या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, एक भरधाव होंडा सिटी कार समोरून आली, आधी कारने दोघा सायकलस्वारांना धडक दिली. त्यानंतर थेट रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारला धडक दिली. कार एवढ्यावरच थांबली नाहीतर कारला धडक दिल्यानंतरही तिथून पसारा झाली.

या कारमध्ये 3 ते 4 लोकं बसलेली होती. या घटनेचा व्हिडिओ एनआयएने ट्वीट केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कारच्या वेगाची आणि अपघाताची तीव्रता लक्षात येईल.  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कार जप्त केली आहे. कारचालकासह इतर प्रवाशी फरार झाले आहे. फरार झाल्या आरोपींचा शोध सुरू आहे.  या कारमध्ये एक हुक्का सापडला आहे. त्यावरून आरोपींनी नशा केला होता, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

टेक ऑफ करताना निखळलं विमानाचं चाक, मग लँडिंग कसं झालं?

तुमच्या विमानानं टेक ऑफ घेतल्यानंतर आता पुढे काय? असा प्रश्न तुम्हाला दरवेळी पडत असेल. विमान स्थिर होईपर्यंत खूप घाबरायलाही होतं. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. या विमानाने टेक ऑफ केल्यानंतर विमानाचं एक चाक निखळून पडलं. हा व्हिडिओ बघून अनेकांना धडकी भरली. या विमानाचं पुढे काय झालं असेल असाही प्रश्न पडला.हे विमान कॅनडा एक्सप्रेसचं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण खरंच असं घडलंय. एका प्रवाशाने विमानातूनच या घटनेचं व्हिडिओ शूटिंग केलं.त्याने ट्विटरवर लिहिलं, मी ज्या विमानात आहे त्या विमानाचं एक चाक निखळलंय. 2020 या वर्षाची सुरुवात चांगली झाली.

या व्हिडिओच्या फूटेजमध्ये टेक ऑफच्या आधी चाकांमधून ठिणग्या बाहेर पडताना दिसल्या. त्यावर एका प्रवाशाने लिहिलं की, असं काही होण्याआधी विमानाचं चाक ठीकठाक वाटत होतं.

एकाने लिहिलंय, मी जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा मला वाटलं, ही चाकं कुठे पडली असतील? पण नंतर कळलं हे विमान टेकऑफच्या नंतर लगेचच पडलं. त्यामुळे दुर्घटना टळली.

एका प्रवाशाने लिहिलं, हे खूपच खतरनाक होतं. असं आधी कधीच घडलं नव्हतं. इन्पेक्शन आणि मेन्टेनन्सचं हे अपयश आहे.

Published by: sachin Salve
First published: January 12, 2020, 6:51 PM IST
Tags: haryana

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading