News18 Lokmat

VIDEO : राजीव गांधींची हत्या दहशतवादी घटना की अपघात? भाजप मंत्र्याचा सवाल

News18 Lokmat | Updated On: Mar 5, 2019 01:03 PM IST

VIDEO : राजीव गांधींची हत्या दहशतवादी घटना की अपघात? भाजप मंत्र्याचा सवाल

नवी दिल्ली,5 मार्च : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा 'दुर्घटना' असा उल्लेख करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह नवीन वादात अडकले आहेत. पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंह यांनीही दिग्विजय सिंह यांचा चांगल्याच भाषेत समाचार घेतला आहे. 'राजीव गांधी यांची हत्या दहशतवादी घटना होती की अपघात?', असा प्रश्न विचारत व्ही.के. सिंह यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही दिग्विजय सिंह यांच्या विधानावर जोरदार टीका केली आहे. जावडेकर म्हणालेत की,'काँग्रेस पक्षाला नेमकं काय झालंय?. भारतीय सैन्याने एअर स्ट्राईकची दिलेली माहिती खोटी ठरवत आहेत. आपल्याच सैन्यावर विश्वास ठेवला जात नाही, असा प्रकार कोणत्याही लोकशाही देशात घडत नाही.'


Loading...








वाचा : भाजपची वेबसाइट झाली हॅक, उघडताच दिसू लागले अश्लील शब्द

शहिदांचा अपमान! दिग्विजय सिंह यांनी पुलवामा हल्ल्याचा 'दुर्घटना' म्हणून केला उल्लेख


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. यासंदर्भात ट्विट करताना दिग्विजय सिंह यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख 'पुलवामा दुर्घटना' असा करून नवीन वाद निर्माण केला आहे. दिग्विजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''आम्हाला आमच्या जवानांचा, त्यांच्या शौर्याचा अभिमान आहे आणि त्यांच्यावर विश्वासदेखील आहे. सैन्यामध्ये माझ्या अनेक ओळखीचे आणि जवळचे नातेवाईक कार्यरत आहेत. ज्यांना कुटुंबीयांपासून दूर राहून देशवासीयांचे संरक्षण करताना मी पाहिले आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. पण पुलवामा दुर्घटनेनंतर आपल्या वायुदलाने केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईवर काही परदेशी माध्यमांमध्ये शंका उपस्थित केली जात आहे, ज्यामुळे भारत सरकारच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. हल्ला झाला त्यावेळेस सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 12:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...