‘लग्न करायचं असल्यास हिंदू धर्म स्वीकार, मांसाहार सोडून दे’

‘लग्न करायचं असल्यास हिंदू धर्म स्वीकार, मांसाहार सोडून दे’

तरूणीनं तरूणापुढे ठेवलेल्या अटीमुळे आता पोलिस देखील चक्रावून गेले आहेत.

  • Share this:

सुरत, 05 मे : गुजरातमधील सुरत येथे समोर आलेल्या प्रेम प्रकरणामुळे सर्वच जण चक्रावून गेले आहेत. शिवाय, पोलिसांपुढे देखील यातून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न पडला आहे. कारण, माझ्याशी लग्न करायचं असल्यास हिंदू धर्माचा स्वीकार कर आणि मासांहार सोडून दे अशी अट तरूणीनं आपल्या मुस्लिम प्रियकरासमोर ठेवली. शिवाय, तसं प्रतिज्ञापत्र देखील तरूणीनं पोलीस ठाण्यात दिलं. त्यानंतर मी प्रियकराशी लग्न करेन असं तरूणीचं म्हणणं आहे. त्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.

काय आहे सारं प्रकरण?

सुरतमधील एका हिंदू तरूणीचं मुस्लिम तरूणाशी प्रेम झालं. तिला आपल्या प्रियकरासोबत लिव्ह – इन – रिलेशिनशीपमध्ये राहायचं होतं. पण, घरच्यांची मात्र या साऱ्याला तयारी नव्हती. अखेर दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तरूणीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.

‘राहुल गांधी तुमच्या वडिलांचा कार्यकाळ भ्रष्टाचारी नंबर 1 म्हणून संपला’

तक्रार दाखल केल्यानंतर तीन दिवसांनी पोलिसांनी तरूणीचा शोध घेतला. त्यानंतर देखील आपल्याला मुस्लिम प्रियकरासोबत लग्न करण्यावर तरूणी ठाम राहिली. यावर ती थांबली नाही तर तिनं पोलीस ठाण्यात एक प्रतिज्ञापत्र सादर केलं. यामध्ये तरूणीनं आपल्य़ा प्रियकरांनं हिंदू धर्माचा स्वीकार करावा. त्यानंतर तो पुन्हा केव्हाच मुस्लिम धर्माचा स्वीकार करणार नाही आणि मांसाहार देखील सोडून देईल अशी अट ठेवली. त्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले. तरूणीनं यापूर्वी लग्नासाठी नाव नोंदणी देखील केली आहे. पण, आता तरूणानं अटी न मानल्यास ती त्याच्याशी लग्न करणार नाही. यासाऱ्या घडामोडी पाहिल्यानंतर आता पोलिस हे सारं प्रकरण कसं हाताळणार हे पाहावं लागणार आहे.

VIDEO: मी संन्यासी आहे, साध्वी प्रज्ञासिंह यांचं निवडणूक आयोगाला उत्तर

First published: May 5, 2019, 12:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading