नवी दिल्ली, 29 मार्च : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभेसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसला यश मिळवून देण्यासाठी जे करता येईल ते करण्याची राहुल गांधींची तयारी सुरू आहे. यातच त्यांनी देशातील व्यापार वाढवण्यासाठी आणि नोकऱ्यांची निर्मिती करण्यासाठी एक चार मुद्द्यांची योजना तयार केली आहे. याची माहिती त्यांनी ट्वीट करून दिली आहे.
राहुल गांधींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, तुम्हाला नवीन व्यवसाय करायचा आहे का? भारतासाठी नोकऱ्यांची निर्मिती करायची आहे का? यासाठी आमच्याकडे एक योजना आहे. एंजल टॅक्स बंद केला जाईल, कंपनीने जर रोजगारनिर्मिती चांगली केली तर त्यांना आर्थिक मदतही दिली जाईल. लोकांना सहज कर्ज उपलब्ध करुन दिले जाईल. तसेच पुढच्या तीन वर्षांसाठी व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घ्यावी लागणार नाही.
कोणत्याही नव्या कंपनीच्या गुंतवणुकीवर आकारण्यात येणाऱ्या कराला एंजल टॅक्स म्हटलं जातं. सध्या एंजल टॅक्स 30 टक्के आहे. राहुल गांधींनी ट्वीट करून सांगितले की, त्यांच्याकडे देशात रोजगार वाढवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी चतु:सूत्री योजना आहे.
पीटीआयशी बोलताना राहुल गांधींनी म्हटले की, गृहउद्योगांना चालना देण्याला काँग्रेसचं प्राधान्या आहे. सध्या नवे व्यवसाय लालफीतीत अडकू नये यासाठी काय करता येईल हे पाहत आहे. वेगवेगळ्या संस्थांकजून निवडणूक पूर्व सर्वेमध्ये बेरोजगारी हा मुख्य मुद्दा असल्य़ाचे सांगितले जात आहे. एनएसएसओच्या अहवालानुसार 2017-18 मध्ये बेरोजगारीचे प्रमाण 45 वर्षात सर्वाधिक असल्याचं समोर आलं होतं.
SPECIAL REPORT : पार्थ पवारांचा मावळ जिंकण्याचा मनसुबा, काँग्रेसची नाराजी महागात पडणार?