तुम्ही कुणाला मत दिलं ? यावेळी अशी होणार पडताळणी

तुम्ही कुणाला मत दिलं ? यावेळी अशी होणार पडताळणी

लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात पाच ठिकाणी मतदान यंत्रांची पडताळणी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मतदानाची विश्वासार्हता तपासण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 एप्रिल : मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचे आरोप झाले होते. या आरोपावरून गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने यावेळी सगळ्या मतदान केंद्रात मतदानाची प्रिंट काढण्याची सुविधा दिली आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचं बटन दाबलं की आपण कोणाला मत दिलं याची एक स्लिप मतदान यंत्रामध्ये येईल. ही स्लिप मतदार आपल्यासोबत नेऊ शकणार नाहीत पण आपण ज्या उमेदवाराला मतदान केलं तिथेच ते मत पडलं आहे ना याची पडताळणी या स्लिपमुळे होऊ शकेल.मतदान यंत्रात ७ सेकंद ही स्लिप आपल्याला दिसू शकेल.

मतमोजणी करताना या प्रिंटची पडताळणी करण्याचीही सुविधा आहे. सुप्रीम कोर्टाने आता लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात पाच ठिकाणी पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. मतदानाची विश्वासार्हता तपासण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रत्येक मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातल्या 50 टक्के प्रिंट्स तपासाव्या, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. पण सुप्रीम कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही पडताळणी करायची झाली तर प्रचंड प्रमाणात मनुष्यबळ लागेल आणि त्यासाठी मोठी यंत्रणा राबवावी लागेल, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटलं आहे.

मतदान यंत्रामध्ये मतदानाचा पुरावा देणाऱ्या या प्रिंट आउटमुळे यावेळी नव्या पद्धतीने मतदान केलं जाणार आहे. याची माहिती प्रत्येक मतदारानेही घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदानाची पडताळणी होणार असल्याने राजकीय पक्षांना दिलासा मिळाला आहे.या स्लिपमुळे यावेळी तरी मतदान यंत्र हॅक झाल्याचे आरोप होणार नाहीत, अशी आशा आहे.

निवडणुकीच्या ताज्या अपडेट्ससाठी इथे  क्लिक करा.

=========================================================================================================================================================

First published: April 8, 2019, 4:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading