लोकसभा 2019: सहाव्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात, भाजपसाठी महत्त्वाचा टप्पा

लोकसभा 2019: सहाव्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात, भाजपसाठी महत्त्वाचा टप्पा

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 मे: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 7 राज्यातील 59 जागांवर मतदान होत आहे. सहाव्या टप्प्यात दिल्लीती 7, हरियाणातील 10, उत्तर प्रदेशमधील 14, मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 8 तर झारखंडमध्ये चार जागांवर मतदान होत आहे. एकूण 979 उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात एकूण 10.17 कोटी मतदान आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. सात राज्यात मिळून निवडणूक आयोगाने 1.13 लाख मतदान केंद्राची निर्मिती केली आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, दिनेश लाल निरहुआ, मेनका गांधी, दिग्विजय सिंह, साध्वी प्रज्ञासिंह, ज्योतिरादित्य सिंधिया, नरेंद्र सिंह तौमर, शीला दीक्षित, विजेंन्दर सिंह, हर्षवर्धन, गौतम गंभीर, भूपेंन्द्र सिंह हुड्डा आणि कीर्ती आझाद या दिग्गज नेत्यांच्या भविष्याचा फैसला होणार आहे.

भाजपसाठी हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. गेल्या म्हणजेच 2014च्या निवडणुकीत भाजपने या टप्प्यातील 45 जागांवर विजय मिळवला होता. तर तृणमूलने ८, काँग्रेसने २ तर सपा आणि लोजपाने प्रत्येकी एक जागेवर विजय मिळवला होता.


साताऱ्यात राज ठाकरेंची सभा उदयनराजेंना तारणार का? पाहा हा SPECIAL REPORT
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2019 07:46 AM IST

ताज्या बातम्या