प्रियांका फक्त सुंदर आहेत, पण...; भाजपच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

प्रियांका फक्त सुंदर आहेत, पण...; भाजपच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

' राजकारणात फक्त सुंदर असण्यामुळे मतं मिळत नाहीत.बाकी त्याचं कर्तृत्व काय आहे?'

  • Share this:

पाटना 25 जानेवारी : प्रियांका गांधींची राजकारणात एंट्री झाल्यानंतर आता राजकारणही सुरू झालंय. अनेक पक्षांच्या नेत्यांनी प्रियांकाचं स्वागत केलंय. तर अनेक पक्षांनी टीका. टीका करणाऱ्यांमध्ये भाजपचे नेते अग्रभागी आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री आणि भाजपचे नेते विनोद नारायण झा यांनीही अकलेचे तारे तोडले आहेत.

प्रियांका गांधी यांच्यावर टीका करताना त्यांनी पातळी सोडून टीका केली. ते म्हणाले, " प्रियांका या फक्त सुंदर आहेत. बाकी त्याचं कर्तृत्व काहीही नाही. राजकारणात फक्त सुंदर असण्यामुळे मतं मिळत नाहीत." झा फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्याही पुढे जाऊन ते म्हणाले, प्रियांका यांची ओळख ही त्या रॉबर्ट वड्रा यांच्या पत्नी आहेत ही सुद्धा आहे. रॉबर्ट हे अनेक जमीन घोटाळ्यात अडकले असून त्या घोटाळ्यातले आरोपी आहेत.

झा यांच्या वक्तव्यावर आता चौफेर टीका होत आहेत. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी जोरदार टीका केलीय. महिलांबाबत बोलताना नेत्यांकडून अधिक जबाबदारीचं आणि सभ्यपणे व्यक्त होणं अपेक्षीत आहे असं मत व्यक्त केलं जातंय. तर राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना धारेवर धरलंय. नितीशकुमार यांनी त्यांच्या मंत्र्यांना हेच शिकवलं का? असा सवाल त्यांनी केलाय.

First published: January 25, 2019, 4:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading