नवी दिल्ली 12 मे : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सात राज्यांमधल्या 59 जागांवर रविवारी (12 मे ) मतदान झालं. पश्चिम बंगाल वगळता हे मतदान शांततेत पार पडलं. मात्र मतदानाच्या सर्वात जास्त टक्केवारीत पश्चिम बंगालने आपला क्रमांक कायम राखला. मतदानाची एकूण टक्केवारी ही 63.43 टक्के असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. या टप्प्यातही सर्वात जास्त मतदान 80.35 टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये झालं. या आधीच्या सर्व पाच टप्प्यांमध्येही पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त मतदान झालं आहे.
या आधीच्या टप्प्यांमध्येही बंगालमध्येच सर्वाधिक मतदान झालं होतं. इतर राज्यांमधलीही मतदानाची टक्केवारी चांगली राहिली. बिहार - 59.29 टक्के, हरियाणा - 68.17, मध्य प्रदेश - 64.55, उत्तर प्रदेश - 54.72, पश्चिम बंगाल - 80.35, झारखंड - 64.50, दिल्ली - 59.74 या टप्प्यात दिल्लीतल्या सर्व सात जागांवर मतदान पार पाडलं.
असं झालं मतदान
....................
एकूण - 63.43 टक्के
..................................
पश्चिम बंगाल - 80.35
बिहार - 59.29 टक्के
हरियाणा - 68.17
मध्य प्रदेश - 64.55
उत्तर प्रदेश - 54.72
झारखंड - 64.50
दिल्ली - 59.74
Estimated voter turnout recorded till 9 pm in Lok Sabha Election 2019 in #Phase6: Total 63.43% voting. West Bengal- 80.35, Delhi-59.74, Haryana- 68.17, Uttar Pradesh- 54.72, Bihar- 59.29, Jharkhand- 64.50, Madhya Pradesh- 64.55 pic.twitter.com/Rl6vJULdmW
— ANI (@ANI) May 12, 2019
पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार
मतदानाच्या आधी बंगालमधीव झारग्राम इथं भारतीय जनता पार्टीच्या बूथ कार्यकर्त्याचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचाही मृतदेह आढळला आहे. याशिवाय तृणमूलच्या दोन कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे.
पश्चिम बंगालमध्ये मतदानासोबतच हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मिदनापूर इथल्या तृणमूलच्या दोन कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्यात आला आहे. दोन्ही कार्यकर्त्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
झारग्राम इथं भाजप कार्यकर्त्याचा खून झाल्याचा आरोप स्थानिक नेत्यांनी केला आहे. रामेन सिंह नावाच्या कार्यकर्त्याच्या खूनाला तृणमूल जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र, पोलिसांनी हा खून नसल्याचं म्हटलं आहे. प्राथमिक तपासात रामेन सिंह आजारी होता असं पोलिसांनी सांगितले. त्याचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
मरधारातील कांठी इथं तृणमूल कार्यकर्त्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. तृणमूल कार्यकर्ता एक दिवस आधी बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेहच मिळाला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.