इराकहून 'त्या' 38 भारतीयांचं पार्थिव भारतात दाखल

इराकहून 38 भारतीयांचे पार्थिव घेऊन केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंग अमृतसर एअरपोर्टवर दाखल झालेत. भारतीय वायूदलाचं कार्गो विमान अमृतसरमध्ये दाखल झालंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 2, 2018 03:27 PM IST

इराकहून 'त्या' 38 भारतीयांचं पार्थिव भारतात दाखल

02 एप्रिल : इराकहून 38 भारतीयांचे पार्थिव घेऊन केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंग अमृतसर एअरपोर्टवर दाखल झालेत. भारतीय वायूदलाचं कार्गो विमान अमृतसरमध्ये दाखल झालंय. त्यानंतर ते पाटणा आणि कोलकात्यालाही जाईल. या 39 जणांना मोसूलहून आयसिसचे जवान बदूश शहरात घेऊन गेले. बदूशमध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती. नंतर या सर्वांना एकाच कबरीत पुरले गेले.

Loading...

दरम्यान, व्ही. के. सिंह यांनी बगदादमधला एक व्हिडिओ ट्विट केलाय. बगदाद विमानतळावर शवपेट्या विमानात ठेवल्या जाताना या व्हिडिओत दिसत होतं.आता हे विमान अमृतसर एअरपोर्टवर दाखल झालंय.

3 साडेतीन  वर्षांपूर्वी आयसिसने इराक  आणि  सिरीया या दोन देशातील अनेक शहरं ताब्यात घेतली होती. तेव्हा तेथील 40  अनिवासी भारतीयांचे अपहरण करण्यात आलं होतं. त्यातल्या एकाने आपण बांग्लादेशी मुसलमान असल्याचं सांगून स्वत:ची सुटका करून घेतली होती. उरलेल्या 39 जणांचं काय  झालं याबद्दल काही माहिती मिळाली नव्हती.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2018 03:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...