Home /News /national /

BREAKING: बंदराजवळच्या गोदीत क्रेन कोसळून 10 ठार; समोर आला धक्कादायक VIDEO

BREAKING: बंदराजवळच्या गोदीत क्रेन कोसळून 10 ठार; समोर आला धक्कादायक VIDEO

विशाखापट्टणम इथे गॅस गळतीनंतर पुन्हा एक मोठी दुर्घटना समोर आली आहे.

    विशाखापट्टणम, 01 ऑगस्ट : विशाखापट्टणम इथे गॅस गळतीनंतर पुन्हा एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. बंदरात क्रेन कोसळून मोठी दुर्घटना घडली. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड इथे क्रेन कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एक मजूर जखमी आहे. लोडिंग कामाची पाहणी करताना क्रेन कोसळल्याने 10 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी मजुराला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. घटनास्थळी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू आणि 1 जखमी झाल्याचे डीसीपी सुरेश बाबू यांनी माहिती दिली. हे वाचा-निसर्ग चक्रीवादळाच्या मदतनिधी वाटपात घोळ, धक्कादायक माहिती समोर तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता अचानक काही कळण्याच्या आता क्रेन एका बाजूला कोसळते. ही भीषण दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. क्रेन कोसळल्यानं 10 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. याआधी विशाखापट्टणम इथे दोन वेळा गॅस गळतीची दुर्घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ही मोठी घटना समोर आली आहे. अनलॉक 3 च्या पहिल्याच टप्प्यात ही दुर्घटना घडली असल्यानं या प्रकरणी चौकशीची मागणी केली जात आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Visakhapatnam, Visakhapatnam S01p04

    पुढील बातम्या