ट्रम्प यांचा पाकिस्तानला दणका, घेतला हा मोठा निर्णय

ट्रम्प यांचा पाकिस्तानला दणका, घेतला हा मोठा निर्णय

अमेरिकेच्या या निर्णयाने पाकिस्तानला मोठा फटका

  • Share this:

नवी दिल्ली,06 मार्च : दहशतवादाला खतपाणी घालणं आता पाकिस्तानला आणखी अडचणीत टाकणार आहे. दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढत आहे. यातच अमेरिकन सरकारने पाकिस्तानच्या नागरिकांच्या व्हिसाची मुदत कमी केली आहे.

पाकिस्तानच्या नागरिकांना सध्या पाच वर्षांचा व्हिसा मिळत होता. मात्र, यापुढे त्यांना फक्त एक वर्ष मुदतीचा व्हिसा दिला जाईल. तर पत्रकारांना यात तीन महिने अधिकची सूट दिली जाणार आहे. याबाबतचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे.

अमेरिकन राजदुतांना याबाबतची माहिती पाकिस्तानला दिली आहे. नव्या नियमानुसार पाकिस्तानी नागरिकांना तीन महिन्यांपेक्षा जास्त मुदतीचा व्हिसा दिला जाणार नाही. तसेच कामगार, पत्रकार, धार्मिक व्हिसाच्या फीमध्येही वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत घेण्यात य़ेणाऱ्या फीपेक्षा 32 ते 38 डॉलर जास्त फी घेतली जाणार असल्याचे समजते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जम्मू काश्मीर येथील पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भयंकर असल्याचे म्हटले होते. जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या प्रकरणाचा अहवाल पाहिल्यानंतर मोठा निर्णय घेऊ असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.

पुलवामात 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला. भारतासह इतर देशांनीही दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर पाकने दहशतवाद्यांची धरपक़ड सुरू केली आहे.

VIDEO : देव तारी त्याला कोण मारी! चिमुकला दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला, अन्...

First published: March 6, 2019, 12:05 PM IST
Tags: pakistan

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading