Home /News /national /

VIDEO: भारत पाकिस्तान सीमेवर जवानांचा भांगडा, सैनिकांचा जोश पाहून सेहवागचंही बल्ले बल्ले!

VIDEO: भारत पाकिस्तान सीमेवर जवानांचा भांगडा, सैनिकांचा जोश पाहून सेहवागचंही बल्ले बल्ले!

सीमेवर काम करणारे हे जवान सतत तणावपूर्ण परिस्थितीत काम करत असतात. अशा वातावरणात सातत्याने काम केल्यावर जवानांनाही काही हलक्या फुलक्या क्षणांची गरज असते. त्यामुळे मग जवान असे काही क्षण अनुभवत असतात.

    नवी दिल्ली 18 जुलै: माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)  हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. देशभक्ती आणि जवानांबद्दल त्यांचं असलेलं प्रेम त्यातून कायम दिसत असतं. सेहवाग यांनी नुकताच ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर (India-Pakistan border)  जवान भांगडा करतांनाचा तो व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी जवानांच्या जोश आणि ऊर्जेचं कौतुक केलं आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थिती हे जवान काम करतात. सतत शत्रूचा असलेला धोका अशा परिस्थितीतही हे जवान आपला उत्साह टिकविण्यासाठी भांगडा करत असल्याने सेहवाग त्यांचं कौतुक करत आहेत. या जवानांना पाहून खूप आनंद झाला. जय जवान! असंही सेहवागने म्हटलं आहे. हा पूर्ण व्हिडीओ 59 सेकंदांचा असून यात 5 जवान भांगडा करतांना दिसत  आहेत. हे जवान प्रसिद्ध पंजाबी गायक शैरी मान यांचं  सुपरहिट गाणं 'तीन पेग' वर भांगडा करत आहेत. 1 लाख 40 हजारांपेक्षा जास्त जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. सीमेवर काम करणारे हे जवान सतत तणावपूर्ण परिस्थितीत काम करत असतात. कधी केव्हा गोळी येईल आणि वेध घेईल याचा काहीच नेम नसतो. अशा वातावरणात सातत्याने काम केल्यावर जवानांनाही काही हलक्या फुलक्या क्षणांची गरज असते. त्यामुळे मग जवान असे काही क्षण अनुभवत असतात. त्यात पंजाबी गाणे आणि भांगडा हा जवानांचा फेव्हरेट आहे. त्याच गाण्यांचा आधार घेत जवानांनी भांगड्यांवर ताल धरला.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या