जयपूर, 8 जून : 'मुस्लीम रुग्णांचा एक्स रे उद्यापासून काढायचा नाही', असा एक संदेश Whatsapp वरून व्हायरल झाला होता. एका खासगी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांमध्ये आपसात चाललेल्या संभाषणाचे स्क्रीन शॉट्स बाहेर पडले आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर पोलिसांनी या रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Whatsapp ग्रूपवर सुरू असलेल्या चॅटवरून गुन्हा दाखल करायची ही पहिलीच वेळ असावी. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात ही घटना घडली आहे. चुरू जिल्ह्यातल्या सरदारशहरमध्ये एका खासगी उपचार केंद्रातल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या Whatsapp ग्रूपमध्ये याविषयी चर्चा सुरू केली. 'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणं बंद केलं पाहिजे.' 'मी उद्यापासून मुस्लीम रुग्णाचा एक्स रे काढणार नाही' अशा अर्थाचे मेसेज या ग्रूपवर शेअर झाले. रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांचा हा अंतर्गत अनौपचारिक ग्रूप होता. पण या ग्रूपवरचे अशा आक्षेपार्ह संभाषणाचे स्क्रीनशॉट बाहेरच्या ग्रूपवरही शेअर झाले. बघता बघता हे स्क्रीनशॉट व्हायरल झाले.
लाइव्ह हिंदुस्थानच्या वेबसाइटवर यासंबंधी बातमी प्रसिद्ध झाली आहे. या वेबसाइटने दिलेल्या बातमीनुसार, सामाजिक तेढ पसरवणाऱ्या या संभाषणाच्या मेसेजची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या प्रकरणी पोलिसांनी या खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांविरोधा FIR दाखल केली आहे. रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर यासंबंधी माहिती नसल्याचा दावा करत आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.
अन्य बातम्याफरार नीरव मोदीला सगळ्यात मोठा धक्का, सर्व मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेशपहले धंदा मर्द संभालते थे अब बचे नही; सुष्मिता सेनच्या वेबसीरिजचा ट्रेलर लॉन्च
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.