S M L

कुंभमेळ्यात सुरू आहे रामाची बँक, इथे चालतं फक्त 'राम चलन'

कुंभमेळ्यात एक अनोखी बँक आहे. या बँकेचं चेकबुक नाही की एटीएमही नाही. ही आहे रामनाम बँक.

News18 Lokmat | Updated On: Feb 1, 2019 03:41 PM IST

कुंभमेळ्यात सुरू आहे रामाची बँक, इथे चालतं फक्त 'राम चलन'

प्रयागराज, 01 फेब्रुवारी : कुंभमेळ्यात एक अनोखी बँक आहे. या बँकेचं चेकबुक नाही की एटीएमही नाही. ही आहे रामनाम बँक. इथे फक्त भगवान रामाचं चलन चालतं. आणि व्याज म्हणून मिळते आत्मिक शांती. या बँकेचे एक लाखाहून जास्त खातेधारक आहेत.

या खातेधारकांकडे एक पुस्तिका असते. त्यात ते 108 वेळा रामाचं नाव लिहितात. संगमावर स्नान केल्यानंतर हे श्रद्धाळू बसून रामाचं नाम लिहितात. स्वर्गात जाणारं खातं उघडून प्रस्थान करतात.

या कुंभमेळ्यात प्रयागराजमधल्या या एकमेव बँकेत सर्व जातींचे लोक एकत्र येऊन धर्माच्या एकतेसाठी राम नाम लिहितात. ही बँक म्हणजे राम नाम सेवा संस्थान या सामाजिक संस्थेप्रमाणे चालते. कमीत कमी नऊ कुंभमेळ्यांत याची स्थापना झालीय.


बँकेत कुठला व्यवहार होत नाही. सदस्यांना 30 पानी वही दिलेली आहे. त्यात 108 काॅलम्स आहेत. रोज त्यात राम नाम लिहिलं जातं. ही पुस्तिका त्या व्यक्तीच्या खात्यात जमा केली जाते. रामाचं नाव लाल शाईनं लिहिलं जातं. कारण लाल रंग प्रेमाचा आहे.

बँकेच्या अध्यक्ष गुंजन वार्ष्णेय म्हणाले, 'खातेधारकाच्या खात्यात रामाचं दिव्य नाव जमा होतं. इतर बँकांप्रमाणे पासबुक दिलं जातं. या सर्व सेवा मोफत असतात. या बँकेत फक्त रामाचं चलन चालतं. राम नाम लिहिल्यानं समर्पणाची भावना निर्माण होते. शांत वाटतं.'

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अख्ख मंत्रिमंडळ  बैठकीसाठी प्रयागराज इथं दाखल झालं होतं. कुंभमेळ्याचं निमित्त साधत योगींनी प्रयागराजला मंत्रिमंडळाची बैठक घेत स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीही पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला.

Loading...

योगी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री शाही स्नानासाठी त्रिवेणी संगमावर दाखल झाले. योगींनी इतर साधू संतांसह गंगेत स्नान केलं.


पाकिस्तानमधल्या 'या' गावात मुस्लिमांपेक्षा हिंदू जास्त राहतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 1, 2019 03:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close