S M L

...आणि सगळ्यांसमोर 'सोनम' वाघिणीने शिकारीला तोंडाने ओढत नेलं! व्हिडिओ व्हायरल

तेलिया धरण परिसरातील अनभिषिक्त राणी असलेल्या सोनम वाघिणीचा हा व्हिडिओ याच भागात शिकार केल्यावर शिकार ओढून नेल्याच्या घटनेचा आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 10, 2018 10:20 AM IST

...आणि सगळ्यांसमोर 'सोनम' वाघिणीने शिकारीला तोंडाने ओढत नेलं! व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूर 10 एप्रिल : जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सोनम वाघिणीच्या शिकारीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भलताच वायरल झाला आहे. तेलिया धरण परिसरातील अनभिषिक्त राणी असलेल्या सोनम वाघिणीचा हा व्हिडिओ याच भागात शिकार केल्यावर शिकार ओढून नेल्याच्या घटनेचा आहे.

सोनम वाघिणीने या भागात सांबराची शिकार केली होती. सोनम वाघीण ४ बछड्यांची आई आहे. या बछड्यांना भरविण्यासाठी सोनमला दर ४ दिवसांनी शिकार करावी लागते.

याच भागातील बजरंग नावाचा वाघ म्हणजे तिचा जोडीदार. आपल्या कुटुंबासाठी सांबराची शिकार करत तिने पर्यटकांच्या गर्दीतून ऐटीत शिकार घेऊन गेल्याचा हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोनमच्या या धाडसाने पर्यटक मात्र आश्चर्यचकित झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 10, 2018 09:03 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close