VIRAL VIDEO : जंगलातला वाघ तुमचा पाठलाग करतो तेव्हा.... अभयारण्यातला थरारक VIDEO

या भयंकर व्हिडिओमध्ये वेगवान बाईकच्या मागे हा चवताळलेला वाघ धावताना दिसतो आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2019 05:55 PM IST

VIRAL VIDEO : जंगलातला वाघ तुमचा पाठलाग करतो तेव्हा.... अभयारण्यातला थरारक VIDEO

मुंबई, 1 जुलै :  जंगल सफारीत किंवा अभयारण्यात वाघाचं दर्शन व्हावं म्हणून पर्यटक किंवा वन्यप्रेमी आसुसलेले असतात. पण हाच वाघ जंगलात पाठलाग करतो तेव्हा काय अवस्था होते, हे दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. Forests and Wildlife Protection Society - FAWPS यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये पट्टेरी वाघ जंगलातून जाणाऱ्या एका रस्त्यावरच्या बाईकचा पाठलाग करताना दिसतो आहे. या भयंकर व्हिडिओमध्ये वेगवान बाईकच्या मागे हा चवताळलेला वाघ धावताना दिसतो आहे. केरळमधल्या मुतंगा अभयारण्यातला हा व्हिडिओ असल्याचं फॉरेस्ट अँड वाईल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटीने पोस्ट करताना म्हटलं आहे.

हा वाघ दुचाकीस्वारांचा पाठलाग करतो आणि रस्त्यावरही येतो. पण आणखी वेग वाढल्यावर जंगलात दुसऱ्या बाजूला निघून जाताना दिसतो.

हा व्हिडिओ 5 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. पोस्ट करताना या संस्थेनं A Tiger is seen chasing a bike in Muthanga Wildlife Safari in Wayanad in Kerala. Is this how the Tiger Parks are managed in India?  अशी कॅप्शनसुद्धा दिली आहे. फेसबुकवरचा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

भारतातल्या अभयारण्यात काय स्थिती आहे पाहा, असं म्हणत केरळमधल्या वायनाडचा हा व्हिडिओ या संस्थेनं फेसबुकवर पोस्ट केला आहे.

Loading...

या व्हिडिओची सत्यता News18 Lokmat ने अद्याप पडताळलेली नाही.

VIRAL FACT: सरकारने वारकऱ्यांना साडेपाच लाख रेनकोट वाटले का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2019 05:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...