डोळ्यात पाणी आणणारा VIDEO : छातीएवढ्या पाण्यातून रिक्षा ओढणाऱ्या माणसाचं रडणं ऐकू येतंय का?

डोळ्यात पाणी आणणारा VIDEO : छातीएवढ्या पाण्यातून रिक्षा ओढणाऱ्या माणसाचं रडणं ऐकू येतंय का?

सोशल मीडियावर कालपासून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नैसर्गिक आपत्तीचं विदारक चित्र यात आहेत पण त्याहीपेक्षा माणसाची अगतिकता दाखवणारा हा व्हिडिओ आहे. म्हणूनच शेकडो लोक Twitter वरून यावर व्यक्त होत आहेत.

  • Share this:

पाटणा (बिहार), 1 ऑक्टोबर : छातीएवढ्या पाण्यातून जिवाच्या आकांताने रिक्षा ओढताना तो माणूस रडतोय. वरून कोणीतरी या भीषण पूरस्थितीचं मोबाईलवर शूटिंग करतंय. इमारतीत वरच्या बाजूला सुरक्षित असलेली माणसं त्याला सांगतात, नको जाऊस अशी रिक्षा ओढत पुढे... पुढे आणखी पाणी आहे. इथेच ठेव रिक्षा. आम्ही लक्ष ठेवतो. पण तो रिक्षावाला ऐकत नाही. पाण्यातून रिक्षा ओढायचा प्रयत्न करत राहतो... त्याची उपजीविका या रिक्षावर आहे. त्याची त्याला जीवापेक्षा जास्त काळजी असावी. आजूबाजूला एवढं पाणी असतानाही तो रिक्षा ओढत राहतो. या माणसाचं रडणं ऐकून भावनाशून्य माणसालाच्या डोळ्यालाही पाझर फुटेल. Twitter वर व्हायरल झालेला हा व्हिडिओ तुम्ही कदाचित पाहिला असेल.

बिहारमध्ये भीषण पूरस्थिती उद्भवली आहे. या पूरस्थितीचं हृदयद्रावक वास्तव हा व्हिडिओ दाखवतो. सोशल मीडियावर कालपासून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बिहारमध्ये राजधानी पाटण्यातली ही परिस्थिती असल्याचं एका यूजरनं लिहिलं आहे.

 पाहा - 17 फुट लांब अजगर चढला पर्यटकांच्या गाडीवर, पाहा हा VIRAL VIDEO

ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिलं आहे की, राजेंद्र नगर या भागातला हा व्हिडिओ आहे. NDRF च्या टीम बिहारमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि बचावकार्य सुरू आहे. पण या माणसाचं रडणं पुराचीच नाही आणि माणसाच्या असहाय्यतेची जाणीव तीव्र करतं.

ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर होताच भरपूर प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सर्वतोपरी मदत देऊ असं सांगितलं आहे. NDRF च्या टीम बचावकार्यात मग्न आहेत. तरीही बिहारमध्ये आतापर्यंत एकट्या बिहारमध्ये 40 पेक्षा जास्त जणांचे जीव गेले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तर भारतात 150 हून अधिक लोकांचा पावसाने आणि पुराने बळी घेतला आहे.

वाचा - कॅप्टन कोहलीनं शेअर केला शर्टलेस व्हिडीओ, युझर म्हणाले...

--------------------------------------------------------------------

साताऱ्यात त्सुनामी, अशी निघाली उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचं एकत्र रॅली, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 05:28 PM IST

ताज्या बातम्या