मराठी बातम्या /बातम्या /देश /

DG पदावरच्या अधिकाऱ्याचा पत्नीला मारहाण करतानाचा हा VIDEO VIRAL; पदावरून हटवलं पण...

DG पदावरच्या अधिकाऱ्याचा पत्नीला मारहाण करतानाचा हा VIDEO VIRAL; पदावरून हटवलं पण...

News18 शी बोलताना DG शर्मा यांनी VIDEO आपलाच असल्याचं मान्य केलं, पण मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. माझी बायको माझ्यावर नाराज असेल तर इतकी वर्षं ती माझ्याबरोबर कशी राहील?' असं ते म्हणाले.

  मनोज राठोड भोपाळ, 28 सप्टेंबर  : DG (पोलीस महासंचालक) दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याचा पत्नीला मारतानाचा VIDEO VIRAL झाल्यावर खळबळ उडाली होती. संबंधित VIDEO मध्ये पोलीस अधिकारी त्यांच्या पत्नीला धरून अक्षरशः जमिनीवर लोळवताना दिसतात. घरात काम करणारा कर्मचारीही पत्नीला वाचवायला मध्ये धावल्याचं दिसतं. VIDEO बद्दल जाहीर चर्चा सुरू झाल्यानंतर मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक पदाचे अधिकारी पुरुषोत्तम शर्मा यांना पदावरून दूर करण्यात आलं आहे. त्यांची रवानगी गृह खात्यात करण्यात आली आहे. पण विशेष म्हणजे शर्मा यांच्याविरोधात अद्याप कोणतीही तक्रार अधिकृतपणे दाखल करण्यात आलेली नाही. "VIDEO आमच्याच घरातला आहे. पण मी कुठलाही गुन्हा केलेला नाही", असंही शर्मा सांगत आहेत. हा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याविषयी विचारलं असता शर्मा News18 शी बोलताना म्हणाले, "हा पती-पत्नीचा घरगुती विषय आहे. मला माहीत नाही हा व्हिडीओ कोणी आणि का बाहेर पसरवला. मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. नेहमीच्या घरगुती भांडणाचा हा भाग आहे" मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी पुरुषोत्तम शर्मा यांच्याकडे लोक अभियोजन (public-prosecution) संचालनालयाची विशेष जबाबदारी होती. ती त्यांच्याकडून काढून घेण्यात आली आहे आणि गृह मंत्रालयात त्यांची बदली केली गेली आहे. या IPS अधिकाऱ्याच्या पत्नीने अद्याप कुठलीच तक्रार दिलेली नाही. VIDEO व्हायरल झाल्यानंतर एक महिला पोलीस पुरुषोत्तम शर्मा यांच्या घरी गेली होती. पण त्या वेळी आपण कुठलीही तक्रर दाखल करणार नाही, असं शर्मांच्या पत्नीने सांगितल्याचं वृत्त आहे. News18 ने शर्मांच्या पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. डीजी शर्मा या प्रकाराबद्दल News18 शी बोलताना म्हणाले, "मुद्दाम या प्रकरणाचा गवगवा केला जात आहे. माझी बायको माझ्यावर नाराज असेल तर इतकी वर्षं ती माझ्याबरोबर कशी राहील? ती माझ्या पैशांचा का वापर करतेय? परदेशी ट्रिपासुद्धा ती माझ्या पैशांवरच करते. हा माझा घरगुती प्रश्न आहे. मीच तो सोडवीन. व्हिडीओमध्ये जे दिसतंय ती मारहाण नाही. भांडणात झआलेली किरकोळ धक्काबुक्की आहे." आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, शर्मा यांच्या विवाहबाह्य प्रकरणाचा पत्नी जाब विचारत होती, त्यावरून शर्मांनी तिला मारहाण केली. त्यांच्या मुलानेच हा व्हिडीओ व्हायरल केल्याचं सांगितलं जातं. पण या माहितीला दुजोरा मिळू शकलेला नाही. DG शर्मांचं नाव  यापूर्वी हनी ट्रॅप प्रकरणातही आलेलं होतं.
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Madhya pradesh, Police

  पुढील बातम्या