विषारी सापासोबत खेळतानाचा काँग्रेस नेत्याचा VIDEO व्हायरल

गुजरातचे वरिष्ठ काँग्रेस नेता परेश धनानी यांचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2018 12:15 PM IST

विषारी सापासोबत खेळतानाचा काँग्रेस नेत्याचा VIDEO व्हायरल

गुजरात, 12 जुलै : गुजरातचे वरिष्ठ काँग्रेस नेता परेश धनानी यांचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धनानी एका विषारी सापाशी खेळत आहे. विरोधी पक्षनेते धनानी यांनी स्वतः हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ धनानी राहत असलेल्या गांधीनगरमधल्या घराजवळचा आहे. तिथे अचानक एक विषारी साप आला होता. आणि तो हातात घेऊन धनानी खेळत होते. हा व्हिडिओ फेसबुकला शेअर करताना त्यांनी लिहिलं की, ‘हा साप रस्ता चुकला आहे आणि माझ्या घरी आला आहे. पण या सापाला कसं पकडायचं हे मला माहित आहे.’

साताऱ्यात तडीपार गुंडाचा खून, शाळेच्या आवारात सापडला मृतदेह

त्यांच्या कोणी कर्मचाऱ्याने हा व्हिडिओ कॅमेऱ्यात शूट केला आहे. या खालील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने धनानी यांनी या सापाची शेपटी हातात धरली आहे. त्यांच्या मडिया कॉडिनेटर नुसार नंतर या सापाला जंगलात सोडण्यात आलं.

काँग्रेस नेता परेश धनानी यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडिओ लोकांनी खूप पंसती दिली आहे.

Loading...

हेही वाचा...

मुंबईला पोहचताच शाहरुखने सर्वात आधी घेतली 'तिची' भेट !

बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे मान्यता पुन्हा खाणार संजय दत्तचा ओरडा?

जिमचा व्यवसाय करून कमवा लाखो रुपये, ही आहे संपूर्ण प्रोसेस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2018 12:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...