Home /News /national /

खुर्चीवर कोण बसणार? यावरुन महिला आमदार आणि डॉक्टरमध्ये वाद, घटनेचा VIDEO VIRAL

खुर्चीवर कोण बसणार? यावरुन महिला आमदार आणि डॉक्टरमध्ये वाद, घटनेचा VIDEO VIRAL

काँग्रेस आमदार (Congress MLA) प्रतिमा कुमारी रुग्णालयाच्या पाहणीसाठी गेल्या होत्या. त्या या रुग्णालयात (Hospital) पोहोचल्या तेव्हा डॉक्टरनं स्वतःची खुर्ची त्यांना बसण्यासाठी देण्यास नकार दिला.

    पाटणा 22 मे : कोरोनाच्या (Corona) संकटादरम्यान रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर (Doctor) दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, अशातच एक भलतीच घटना बिहारच्या वैशालीमधील महुआ येथील राजापाकरच्या चकसिकंदर प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली आहे. हैराण करणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. राजापाकरच्या काँग्रेस आमदार (Congress MLA) प्रतिमा कुमारी रुग्णालयाच्या निरीक्षणासाठी गेल्या होत्या. त्या या रुग्णालयात (Hospital) पोहोचल्या तेव्हा डॉक्टरनं स्वतःची खुर्ची त्यांना बसण्यासाठी देण्यास नकार दिला. यावेळी आमदार डॉक्टर श्याम बाबू सिंह यांना प्रोटोकॉलबद्दल सांगू लागल्या. मात्र, डॉक्टरांनी म्हटलं, की मला असा कोणताही आदेश मिळाला नसून अशा कोणत्याही प्रोटोकॉलबाबत मला माहिती नाही. त्यामुळे, मी माझी खुर्ची देणार नाही. डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून प्रतिमा कुमारी हैराण झाल्या. पुढे या गोष्टीवरुन दोंघामध्ये बराच वेळ वाद झाला. यावेळी दोघेही आपल्या मतावर ठाम राहिले. डॉक्टरनं शेवटपर्यंत आपली खुर्ची आमदाराला दिली नाही. यानंतर दुसरं कोणीतरी आणखी एक खुर्ची घेऊन तिथे आलं आणि अखेर आमदार या खुर्चीवर बसल्या. या संपूर्ण प्रकरणावरुन काँग्रेस आमदार प्रतिमा कुमारी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, की सीएम नितीश कुमार कमजोर झाले आहेत. त्यामुळेच रुग्णालयातील डॉक्टरांनाही प्रोटोकॉलबाबत माहिती नाही. आमदार म्हणाल्या, की नितीश सरकारमध्ये जर लोकप्रतिनिधींचा सन्मान केला जात नसेल तर सामान्य लोकांचे काय हाल असतील, याचा अंदाज लावता येऊ शकतो. त्या म्हणाल्या, की सरकार विरोधीपक्षातील लोकांना लोकप्रतिनिधी मानायलाच तयार नसल्यानं या घटना घडत आहेत. हेच रुग्णालयत बंद असल्यानं पिंपळाच्या झाडाखाली रुग्णांवर उपचार केले जात होते. न्यूज १८ नं हे वृत्तही दिलं होतं. यानंतर आमदार रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेल्या.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Live video viral, Mla

    पुढील बातम्या