VIRAL VIDEO हा कॅब ड्रायव्हर बोलतो अस्खलित संस्कृत; सोशल मीडियावर होतेय चर्चा

सध्या सोशल मीडियावर एका कॅब ड्रायव्हरची चर्चा एका वेगळ्याच कारणामुळे होते आहे. हा कॅब ड्रायव्हर चक्क अस्खलित संस्कृतमध्ये बोलतो. त्याचा संस्कृत बोलतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 03:02 PM IST

VIRAL VIDEO हा कॅब ड्रायव्हर बोलतो अस्खलित संस्कृत; सोशल मीडियावर होतेय चर्चा

मुंबई, 17 जून : कॅब ड्रायव्हर किंवा टॅक्सी ड्रायव्हरबरोबरचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. बहुतेकदा ऐन वेळी कॅब कॅन्सल करणारे, हवं तिथे जाण्यास नकार देणारे टॅक्सी ड्रायव्हर जास्त असतील. पण सध्या सोशल मीडियावर एका कॅब ड्रायव्हरची चर्चा एका वेगळ्याच कारणामुळे होते आहे. हा कॅब ड्रायव्हर चक्क अस्खलित संस्कृतमध्ये बोलतो. त्याचा संस्कृत बोलतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्विटरवर त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. शाळेत शिकलेली ही भाषा आता आठवतही नाही, पण या ड्रायव्हर महाशयांनी मात्र त्या वेळी शिकलेली ही प्राचीन भाषा अजून टिकवून ठेवली आहे.

हा व्हायरल झालेला व्हिडिओ पहिल्यांदा शेअर केला गिरीश भारद्वाज नावाच्या ट्विटर युजरने. भारद्वाज स्वतः व्यावसायिक असल्याचं सांगतात. ते विश्व हिंदू परिषदेचे सदस्य असल्याचंही त्यांचं अकाउंट सांगतं. त्यांनी या ड्रायव्हरशी संस्कृतमधून संवाद साधल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 80,000 च्या वर लोकांनी तो पाहिला आहे आणि हजारो लोकांनी तो लाइक केलाय.
बंगळुरूचा हा कॅब ड्रायव्हर आपलं नाव मल्लप्पा असल्याचं सांगतो. एका शिबिरात संस्कृत शिकलो असंही तो संस्कृतमध्ये सांगतो. अनेक ट्विटर यूजर्सनी या ड्रायव्हरचं कौतुक करत व्हिडिओ रीशेअर केला आहे. अनेकांना असा संस्कृत बोलणारा ड्रायव्हर पाहून आश्चर्य वाटलं, असं त्यांनी  लिहिलं आहे.'तुमचा अभिमान वाटतो', अशा अर्थाच्या पोस्टही बऱ्याच आहेत. देशाच्या अनेक भागांमध्ये संस्कृत ही भाषा शाळेत शिकवली जाते.

शालेय अभ्यासक्रमात संस्कृतचा समावेश असला तरी ही प्राचीन भारतीय भाषा दैनंदिन जगण्याची भाषा राहिलेली नाही. तिचा बोली भाषा म्हणून वापर फारच दुर्मीळ आहे. त्यामुळे हे संस्कृत बोसणारे कॅब ड्रायव्हर चर्चेचा विषय ठरले आहेत.

रिक्षा चालक-मुलाला पोलिसांकडून अमानुषपणे मारहाण, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 03:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close