पाहा VIDEO : माणूस आणि उंटाच्या या शर्यतीत जिंकलं कोण?

पाहा VIDEO : माणूस आणि उंटाच्या या शर्यतीत जिंकलं कोण?

आपल्या सगळ्यांनाच ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट माहीत आहे. हा व्हिडिओही एका शर्यतीचाच व्हिडिओ आहे पण ही शर्यत आहे, एक माणूस आणि उंटाची.

  • Share this:

जयपूर : आपल्या सगळ्यांनाच ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट माहीत आहे. हा व्हिडिओही एका शर्यतीचाच व्हिडिओ आहे पण ही शर्यत आहे, एक माणूस आणि उंटाची. शर्यतीत खरंतर उंट जिंकायला हवा पण इथे मात्र माणूस त्याच्या बुद्धीच्या जोरावर जिंकतो.

हा चिडलेला उंट एका माणसाचा पाठलाग करत होता. जीवाच्या भयाने या माणसानेही धावायला सुरुवात केली. उंटही हार मानत नव्हता. हे पाहून या माणसाने एक युक्ती काढली.

त्याच्या या युक्तीमुळे उंट फसला. ही शर्यत शेवटी चतुर माणसानेच जिंकली आणि स्वत:चा जीवही वाचवला.

माणसाचा पाठलाग करणाऱ्या उंटाला याचा काहीच थांगपत्ता लागला नाही. तो माणूस तिथे नाही हे बघून त्याला मुकाट्याने निघून जावं लागलं ते वेगळंच. म्हणूनच म्हणतात... शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ! फेसबुकवरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ जेवढा मजेशीर आहे तेवढाच या व्हिडिओतल्या माणसाचं चातुर्य दाखवणाराही आहे.

आपलं विक्रम लँडर चंद्रावर उतरलं तो भाग नेमका आहे तरी कसा?

=======================================================================================

SPECIAL REPORT :...म्हणून 4 सूनांनी सासूच्या पार्थिवाला दिला खांदा, ऐकून तुमचेही डोळे पाणावतील!

Published by: Arti Kulkarni
First published: September 10, 2019, 6:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading