मराठी बातम्या /बातम्या /देश /

भूक भागवण्यासाठी मुलं खात होती बेडूक? व्हायरल VIDEO चा बिहार प्रशासनाने केला खुलासा

भूक भागवण्यासाठी मुलं खात होती बेडूक? व्हायरल VIDEO चा बिहार प्रशासनाने केला खुलासा

 'आमच्या घरातील अन्नधान्य संपले आहे. त्यामुळे भूक भागवण्यासाठी आम्ही बेडूक पकडून खातोय. बेडूक पकडल्यानंतर त्यांची कातडी काढून टाकतो आणि नंतर भाजून खातो'

'आमच्या घरातील अन्नधान्य संपले आहे. त्यामुळे भूक भागवण्यासाठी आम्ही बेडूक पकडून खातोय. बेडूक पकडल्यानंतर त्यांची कातडी काढून टाकतो आणि नंतर भाजून खातो'

'आमच्या घरातील अन्नधान्य संपले आहे. त्यामुळे भूक भागवण्यासाठी आम्ही बेडूक पकडून खातोय. बेडूक पकडल्यानंतर त्यांची कातडी काढून टाकतो आणि नंतर भाजून खातो'

  • Published by:  sachin Salve

जहानाबाद, 21 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. अनेक व्यवहार ठप्प आहे. मजूर, हातावर पोट असणाऱ्यांचे यामुळे हाल होत आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. बिहारमध्ये भुकेला शमवण्यासाठी लहान मुलं हे बेडूक खात असल्याचा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ समोर आला होता पण, त्यानंतर या प्रकरणाचा मोठा खुलासा बिहार प्रशासनाने केला.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ बिहारमधील जहानाबाद इथला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.  या  व्हिडिओमध्ये मुलं बेडूक खाताना दिसत आहे. 'आमच्या घरातील अन्नधान्य संपले आहे. त्यामुळे भूक भागवण्यासाठी आम्ही बेडूक पकडून खातोय. बेडूक पकडल्यानंतर त्यांची कातडी काढून टाकतो आणि नंतर भाजून खातो'  असंही पोर या व्हिडिओमध्ये सांगत आहे.

पियुश मिश्रा नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लहान मुलांना दोन वेळेच जेवण देऊ शकत नसणाऱ्या नितीश कुमार सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.

हेही वाचा -उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांची हृदय शस्त्रक्रिया अयशस्वी, जीवाला धोका

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तातडीने दखल घेतली. ज्या परिसरात हा व्हिडिओ घडला तिथे उपाययोजना करण्यात आल्या आहे. या परिसरात जिल्हा प्रशासनानं कम्युनिटी किचनची सुरूवात केली आहे.

दरम्यान, बिहार प्रशासनाकडून या प्रकरणावर पूर्ण खुलासा करण्यात आला आहे. सदरील व्हिडिओतील मुलांच्या घरी चौकशी केली असता त्यांच्या घरी पुरेसे धान्य होते, असा खुलासा बिहारच्या माहिती आणि प्रसारण विभागाने केला. तसंच वरील व्हिडिओ हा चुकीचा असल्याचा खुलासाही केला.

दरम्यान, भारतात कोरोना विषाणूची प्रकरणे सतत वाढत आहेत. आतापर्यंत रुग्णांची संख्या 18 हजारांच्या पलीकडे गेली आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांचा आकडा 18601 इतका आहे. या व्यतिरिक्त 590 लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना रूग्णांची संख्या 17656 होती. त्याच वेळी, तोपर्यंत 559 लोकांचा मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या मागील आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत कोरोना संसर्ग होण्याच्या नवीन प्रकरणांमध्ये 1336 रुग्णांची सर्वाधिक नोंद झाली आहे. तर दिलासादायक बातमी अशी की उपचारानंतर 3252 लोक बरे झाले आहेत. निरोगी लोकांची संख्याही सतत वाढत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: