Home /News /national /

आई शप्पत! चक्क श्वानानं नेलं ट्रिपलसीट, विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

आई शप्पत! चक्क श्वानानं नेलं ट्रिपलसीट, विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

आता हेच बाकी होतं! हायवेवर चक्क श्वानानं चालवली सुसाट बाईक, पाहा VIDEO

    मुंबई, 03 डिसेंबर : साधारण आपण दुचाकीवरून किंवा कारमधून पाळीव प्राण्याला फिरवताना पाहिलं आहे. अनेक व्हिडीओ तर श्वान किंवा मांजर दुचाकीवर डबलसीट बसून गेल्याचे व्हिडीओ देखील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इतकच काय अगदी पोपट आणि कोंबडा देखील दुचाकीवरून फिरताना पाहिलं असेल पण श्वानानं कधी गाडी चालवल्याचं ऐकलं आहे का? एक क्षण डोळ्यांवर विश्वास बसणार नाही पण खरंच एका श्वानानं दुचाकी चालवली आहे. श्वानाला आतापर्यंत डबलसीट किंवा दुचाकी किंवा कारवरून फिरलेलं पाहिलं असेल पण एका श्वानानं थेट दुचाकी चालवली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की दोन तरुण गाडीवर बसले आहेत पण दोघांचेही हात गाडीवर नाहीत. तर चक्क एक श्वान दुचाकी चालवत आहे. शेजारून जाणाऱ्या कार चालकानं ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. हे वाचा-मधमाशांचा विमानावर हल्ला, VIDEO पाहून अंगावर येईल काटा हा व्हिडीओ आतापर्यंत 26 ऑक्टोबर रोजी पोस्ट करण्यात आला आहे. 28 हजारहून अधिक लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ 2019 सालच्या असल्याची माहिती मिळाली आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की श्वान गाडी चालवत आहे आणि दोन लोक त्याच्या मागे बसले आहेत. श्वानानं अक्षरश: ट्रिपलं सीट नेलं आहे. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार बोगी नावाचा हा श्वान फिलिपाइन्सचा रहिवासी आहे. त्याचं वय 11 वर्ष असून त्याच्या सेफ्टीसाठी हेल्मेट देखील घालण्यात आलं आहे. भविष्यात जर श्वान ड्रायव्हर झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नकी असा एका युझरनं म्हटलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या