VIDEO : काम करत नाही म्हणून 82 वर्षांच्या सासूला बेदम मारहाण, सूनेनं काढलं घराबाहेर

VIDEO : काम करत नाही म्हणून 82 वर्षांच्या सासूला बेदम मारहाण, सूनेनं काढलं घराबाहेर

या सूनेवर सासूला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांकडून फरार महिलेचा शोध सुरू आहे.

  • Share this:

सोनीपत, 24 ऑगस्ट : कोरोनाच्या काळात संपूर्ण जग एकमेकांच्या मदतीला धावून येत असताना माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घरात काम न केल्या 82 वर्षांच्या वृद्ध महिलेला बेदम मारहाण केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली. हरियाणातील सोनिपत परिसरात सेक्टर 23 मध्ये ही घटना घडली.

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ दोन्ही नातवंडानी तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सुनेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या महिलेचं वय 82 वर्षाहून अधिक असल्याचं सांगितलं आहे. या सासूला स्वत:हून नीट चालता फिरताही येत नव्हतं.

हे वाचा-…आणि कुत्र्याच्या पट्ट्यावर पाय देताच झाला महिलेचा मृत्यू! पाहा CCTV VIDEO

अशा परिस्थित सूनेनं सासूला घरकाम करण्याची जबरदस्ती केली. काम न केल्यानं सूनेनं सासूला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सध्या ही सून फरार असून पोलिसांकडून तिचा तपास सुरू आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलानं पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या सूनेवर सासूला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांकडून फरार महिलेचा शोध सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 24, 2020, 12:49 PM IST

ताज्या बातम्या