कर्नाटक, 06 जुलै : महाविद्यालयातील तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात 5 विद्यार्थ्यांसह 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गुरुवारी पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याने संपूर्ण कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका गावात हा प्रकार घडला आहे. मार्च महिन्यामध्ये तरुणीवर बलात्कार झाला होता. पण आता त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. आरोपींकडून बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडिय़ावर व्हायरल झाल्याने पोलिसांनी या प्रकरणात 5 विद्यार्थ्यांसह 8 जणांना ताब्यात घेतलं आहे.
आरोपीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याच्या साथीदारांनी तो डाऊनलोड केला होता अशी माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कारमधून तरुणीला जंगलात नेलं आणि तिथे तिच्यासोबत हे दुष्कर्म केलं.
यावेळी आरोपींनी त्याचा व्हिडिओ शूट केला आणि त्यावरून तरुणीला धमकवण्याचा प्रयत्न झाल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे कर्नाटकमध्ये महिलांची सुरक्षा नसल्याचं समोर येतं.
मुलीच्या डोळ्यातून चक्क निघतात खडे; काय आहे या VIDEOमागचं सत्य?