Home /News /national /

28 वर्षाचा वर अन् 8 वर्षाची वधू? बालविवाहाच्या व्हायरल वृत्तानं सरकारलाही लावलं कामाला, अखेर समोर आलं सत्य

28 वर्षाचा वर अन् 8 वर्षाची वधू? बालविवाहाच्या व्हायरल वृत्तानं सरकारलाही लावलं कामाला, अखेर समोर आलं सत्य

सोशल मीडियावर एक फोटो (Photo Viral)काही दिवसांपूर्वी प्रचंड व्हायरल झाला. यात एक नवविवाहित जोडपं दिसत असून नवरीचं वय नवरदेवापेक्षा बरंच कमी असल्याची चर्चा रंगली. नेटकऱ्यांनी याला बालविवाह घोषित करत चौकशीची मागणी केली.

    पाटणा 29 मे : सोशल मीडियामुळे (Social Media) अनेक प्रकरणांमध्ये काही व्यक्तींना न्यायही मिळतो. मात्र, कधी कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचं आणि पूर्णपणे खोटं असलेलं वृत्तही व्हायरल (Viral) होतं आणि लोक त्यावर विश्वासही ठेवतात. बिहारमधूनही (Bihar) अशीच एक घटना समोर आली आहे. मात्र, या घटनेनं केवळ नेटकऱ्यांनाच नाही तर सरकारलाही कामाला लावलं आहे. सोशल मीडियावर एक फोटो काही दिवसांपूर्वी प्रचंड व्हायरल झाला. यात एक नवविवाहित जोडपं दिसत असून नवरीचं वय नवरदेवापेक्षा बरंच कमी असल्याची चर्चा रंगली. नेटकऱ्यांनी याला बालविवाह घोषित करत चौकशीची मागणी केली. लोकांनी याप्रकरणी बिहार सरकारला घेरायला सुरुवात केल्यानं ही बाब प्रशासनाकडे पोहोचली आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू झाला. यासाठी प्रशासनानं एका टीमही तयार केली. मात्र, टीमनं चौकशी सुरू करताच असं समोर आलं, की सरकारी दस्ताएवजांप्रमाणे व्हायरल फोटोमधील ही मुलगी अडल्ट आहे. तिचं वय १९ वर्ष आहे. ती जमुई जिल्ह्यातील अकौनी गावातील रहिवासी असून गेल्या 24 एप्रिलला तिचं लग्न झाले आहे आणि सध्या ती पतीसह तिच्या सासरी राहाते. या फोटोमध्ये दिसत असलेल्या तनू कुमारीनं स्वतः सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा खोटी असल्याचं सांगितलं आहे. तिनं सांगितलं, की हे लग्न तिच्या आणि या दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीनंच झालं आहे. त्यामुळे, हे वृत्त पूर्णपणे खोटं असल्याचं तिनं स्पष्ट केलं. यानंतर प्रशासकीय पातळीवरदेखील जाहिरात प्रसिद्ध करुन या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली. या जाहिरातीत असं म्हटलं गेलं, की 25 मे रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून तथाकथित बालविवाहाची माहिती मिळाली होती. यानंतर प्रशासकीय अधिकारी संबंधित घटनेची चौकशी करण्यासाठी वारिसलीगंज येथे पोहोचले. गावातील लोकांनी त्यांना सांगितलं, की मुलीचं नाव तनु कुमारी, आहे. यानंतर संबंधित मुलीचे आधार कार्ड तपासण्यात आले. यानुसार, संबंधित मुलगी अडल्ट असून व्हायरल वृत्त पूर्णपणे फेक अथवा निराधार असल्याचे स्पष्ट झालं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bihar, Child marriage, Viral news, Viral photo

    पुढील बातम्या