खूपच टेन्शन घेताय राव; मोदी, माल्ल्यानं तुमचं फक्त 184 रुपयांचं नुकसान केलंय

खूपच टेन्शन घेताय राव; मोदी, माल्ल्यानं तुमचं फक्त 184 रुपयांचं नुकसान केलंय

विजय माल्ल्या आणि नीरव मोदी यांनी देशाचे इतके नुकसान केले त्याबद्दल अनेकांच्या मनात राग आहे. पण तुम्ही फार दु:खी होऊ नका. याचे कारण म्हणजे सोशल मीडियावरील एक पोस्ट होय.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी: देशाच्या राजकारणात सध्या राफेल करारासोबतच विजय माल्ल्या आणि नीरव मोदी यांची जोरदार चर्चा आहे. या दोघांनी देशातील बँकांना कोट्यावधींचा चुना लावला. माल्ल्या आणि मोदी देशाबाहेर पळून गेले याला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका केली जाते. सर्व सामान्य नागरिकांचे पैसे या दोघांनी लुटल्याचा आरोप केला जातो. देशातील सामान्य जनता देखील यावर चर्चा करत असते. या दोघांनी देशाचे इतके नुकसान केले त्याबद्दल अनेकांच्या मनात राग आहे. पण तुम्ही फार दु:खी होऊ नका. याचे कारण म्हणजे सोशल मीडियावरील एक पोस्ट होय. या पोस्टमध्ये मोदी आणि माल्ल्या यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीचे नाममात्र नुकसान केल्याचा शोध लावण्यात आला आहे.

हे देखील वाचा: 12 वर्षांपूर्वी केलेल्या 'या' एका चुकीमुळे विजय माल्याचा उद्योग बुडाला

सध्या सोशल मीडियावर आकडेमोड करण्यात आलेल्या एका कागदाची इमेज व्हायरल होत आहे. यात एक अजब गणित मांडण्यात आले आहे. मोदी आणि माल्ल्या यांनी मिळून देशाचे 24 हजार कोटीचे नुकसान केले आहे. यातील मोदीचा 11 तर माल्ल्याचा 13 हजार कोटींचा वाटा आहेत. आता या संख्येला भारताची लोकसंख्या म्हणजेच 130 हजार कोटीने भागले असता उत्तर येते 184 रुपये. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की भारतातील प्रत्येक व्यक्तीचे मोदी आणि माल्ल्याने मिळून केवळ 184 रुपयांचे नुकसान केले आहे.

आता सोशल मीडियावर असा प्रश्न विचारला जात आहे की, मोदी आणि माल्ल्याने मिळून केवळ तुमचे 184 रुपयांचे नुकसान केले असताना तुम्ही उगाच कोट्यावधी रुपयाचे नुकसान केल्यासारखे टेन्शन का घेत आहात. हे सर्व वाचल्यानंतर तुम्हाला देखील थोडा दिलासा मिळाला असेल. कारण सीसीडी किंवा एखाद्या हॉटेलमध्ये चहा, नाष्टा घेतल्यास GSTमिळून यापेक्षा अधिक बिल होते. इतक नव्हे तर यापेक्षा जास्त खर्च एखादा चित्रपट पहायला गेल्यावर होतो. आता कॉफी खराब असेल किंवा चित्रपट अपेक्षेसारखा नसेल तर त्याचे दु:ख तुम्ही आयुष्यभर करणार नाही ना?, या गोष्टीसाठी फार तर तुम्ही 10 मिनिटे विचार कराल आणि सोडून द्याल. मोदी, माल्या प्रकरणात देखील तुम्हाला हाच (छोटेसे नुकसान आहे विसरून जा आणि पुढे जा) सल्ला सध्या सोशल मीडियावरुन दिला जात आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी त्यावर लिहण्यास सुरुवात केली. यावर काहींनी तर असा सल्ला दिला आहे की जास्ट लोड घेऊ नका आणि 'अमृत' चित्रपटातील हे गाणं ऐकत चिल करा...

‘दुनिया में कितना ग़म है, मेरा ग़म कितना कम है’.

Special Report : ऑनलाईन बँकिंग करताना सावधान! या एका गोष्टीमुळे होईल मोठं नुकसान

First published: February 5, 2019, 5:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading