S M L

हा ’मटकामॅन’ दिवसाला भागवतो हजारोंची तहान!

पाणी वाचवण्यासाठी आणि पाण्याचे मोल पटवून देण्यासाठी अनेक संस्था झटत असताना दिल्लीत राहणारे ‘अलग नटराजन’ एक अनोखीच सेवा करतायत.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 8, 2018 12:14 PM IST

हा ’मटकामॅन’ दिवसाला भागवतो हजारोंची तहान!

08 एप्रिल : 'पाणी हेच जीवन आहे' हे जरी आपल्या सगळ्यांना माहित असलं तरी त्याची जाणीव आता बहुतेक जणांना राहिलेली नाही. पाणी वाचवण्यासाठी आणि पाण्याचे मोल पटवून देण्यासाठी अनेक संस्था झटत असताना दिल्लीत राहणारे ‘अलग नटराजन’ एक अनोखीच सेवा करतायत. अलग नटराजन हे रोज हजारो लोकांची तहान भागवण्याचं काम करतात.

त्यांच्या या कामाची सुरवात होते ती सकाळी 4:30 वाजता. रोज 70 पेक्षा जास्त मडकी ते पाण्याने भरून ठेवतात आणि दक्षिण दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणपोईंवर ठेवून येतात. कारण गरजू तहानलेल्यांना पीण्याचं स्वच्छ आणि थंड पाणी पिता येईस. या सगळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा पाणीपुरवाठा ते निशुल्क करतात. पाण्याविना कोणाची वणवण होऊ नये, असे स्वच्छ आणि पाण्यासारखेच निखळ विचार नटराजन यांचे आहेत.

अलग नटराजन हे दिल्लीच्या पंचशील पार्कमध्ये राहतात. माणुसकीला जपत सगळ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणाऱ्या नटराजन यांना सगळे ’मटकामॅन’ असं म्हणतात. 68 वर्षांचे नटराजन हे निवृत्त इंजिनियर आहेत. त्यांनी लंडनला 32 वर्ष इंजिनियर म्हणून नोकरी केली.

आपल्या निवृत्तीनंतर ते मायदेशी म्हणजेच भारतात परतले आणि त्यानंतर वेध लागले ते समाजसेवेचे. फक्त पाणी सेवाच नाही तर त्यांनी कॅन्सर रुग्णांनासुद्धा सेवा पुरवली आहे. गोरगरीबांच्या कुटुंबात जन्मसोहळ्यापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत त्यांनी अनेकांना मदत केली आहे.

जागोजागो पाण्याची मडकी पोहचवण्यासाठी ते प्रत्येक पाणपोईवर 4 वेळा फेऱ्या मारतात. त्यांच्या या अनोख्या सेवेचा दिल्लीकरांना मोठा अभिमान आहे. त्यांचा हा उपक्रम प्रत्येक नागरिकासाठी एक आदर्श आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2018 12:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close