डोनाल्ड ट्रम्प यांची WWFच्या मालकाला मारहाण, स्टेडियममध्ये करायला लावलं होतं टक्कल VIDEO VIRAL

2020 साली होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल

News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2019 03:13 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांची WWFच्या मालकाला मारहाण, स्टेडियममध्ये करायला लावलं होतं टक्कल VIDEO VIRAL

न्यूयॉर्क, 26 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर 2020 मध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहेत. त्याचं बिगुलही आता वाजलं आहे. ह्युस्टनमधील हाउडी मोदी कार्यक्रमात अब की बार ट्र्म्प सरकारचा नाऱ्याची आठवण नरेंद्र मोदी यांनी करून दिली आणि निवडणुकीचं बिगूल वाजलं असं म्हटलं जातंय. 2020 साली होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा प्रचार सुरू आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर जुना व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तुफान लाईक्स मिळत आहेत. या व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प WWF चे मालक विन्स मॅकमॅह़ॉन यांना मारहाण केल्याचं दिसतंय. आणि जबरदस्ती त्यांचं भर स्टेडियममध्ये टक्कल करण्यात आलं होतं. ह्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा ट्रम्प सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाले आहेत.

मी काय तबला वाजवण्यासाठी आहे का? टीकाकारांवर रवी शास्त्री भडकले

ट्रम्प यांच्या समर्थकांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करून विरोधकांना इशारा देत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात कोणी निवडणुकीला उभं राहिलं तर ट्रम्प त्यांची अशी अवस्था करतील अशा प्रकारे ट्विट केले जात आहेत.

एकीकडे भारतात निवडणुकांचे वारे वाहात असताना हाउडी मोदी कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचाही नारळ फोडला आहे. त्यामुळे अमेरिकेतही सोशल मीडियावर प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे.

आफ्रिदी की विराट? डेटवर जाण्यासाठी पाकिस्तानी तरूणींनी सांगितली पहिली पसंती

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ खरा आहे. मात्र तो 2007 सालचा असल्याची माहिती मिळाली. 2007 साली WWF wrestlemania 23 मध्ये ट्रम्प यांनी वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेनमेंटचे मालक विन्स मॅकहॉल्स यांना जबरदस्त मारहाण करुन स्टेडियममध्ये सर्वांसमोर त्यांचं टक्कल केलं होतं. बॅटल ऑफ द बिलिओनर्स मॅचमध्ये चिटिंग झाली होती. त्यावेळी मॅचचा रेफरी विन्स मॅकहॉन यांचा मुलगा होता. त्यांनी मॅचमध्ये विश्वासघात करून ड्रम्प यांच्या बाजुच्या खेळाडू विरोधात डाव साधला आणि तो सामना ड्रम्प यांचा स्पर्धक हरला. याचाच राग मनात ठेवून ट्रम्प यांनी हा त्यावेळी बदला घेतला होता.

अमेरिकेतील निवड़णुकांचे वारे पाहता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्राम्प पुन्हा एकदा अशा पद्धतीनं विरोधकांचा धोबीपछाड करतील असा दावा समर्थकांनी सोशल मीडियावर करत हे व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2019 03:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...