व्हायरल CD मुळे राजकीय खळबळ; महापौरांचे पती अन् RSS प्रचारक 20 कोटी कमिशन मागताना कॅमेऱ्यात कैद

व्हायरल CD मुळे राजकीय खळबळ; महापौरांचे पती अन् RSS प्रचारक 20 कोटी कमिशन मागताना कॅमेऱ्यात कैद

राजस्थानच्या राजकारणात आणखी एक सीडी प्रकरण समोर आलं आहे. सीडी व्हायरल होताच सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केस दाखल केली आहे.

  • Share this:

जयपूर 11 जून: राजस्थानच्या (Rajasthan) राजकारणात आणखी एक सीडी प्रकरण समोर आलं आहे. सीडी व्हायरल होताच सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केस दाखल केली आहे. हे प्रकरण पाहाता असं दिसतं, की याची तयारी खूप आधीपासूनच केली जात होती. ही सीडी कुठून आली आणि कोणी रिलीज केली, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, CD व्हायरल (CD Viral) होताच राजस्थान सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ज्या प्रकारे प्रकरण दाखल केलं आहे, ते पाहता असं दिसतं की याची तयारी आधीपासूनच सुरू होती.

सीडीमध्ये जयपूर ग्रेटर कॉर्पोरेशनच्या निलंबित महापौर सौम्य गुर्जर यांचे पती राजाराम गुर्जर हे बिल मंजूर करण्याच्या बदल्यात पैशांच्या व्यवहाराबद्दल कचरा साफसफाई करणार्‍या कंपनीच्या प्रतिनिधींशी बोलत आहेत. त्यांच्यासोबत यात राजस्थानमध्ये संघ प्रचारकाच्या भूमिकेत काम करणारे निंबा रामदेखील दिसत आहेत.

वसुंधरा राजे यांच्या कार्यकाळात या कंपनीला कचरा गोळा करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. याच्याच बिलांच्या देयकासाठी निलंबित सौम्य गुर्जर आणि भाजपच्या तीन कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्तांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर जयपूर ग्रेटर कॉर्पोरेशनच्या महापौर सौम्या गुर्जर आणि भाजपचे तीन नगरसेवक पारस जैन, अजय चौहान आणि शंकर शर्मा यांना निलंबित करण्यात आले होते.

न्यायालयाकडून दिलासा पण... परमबीर सिंह यांच्या अडचणीत पुन्हा नव्यानं भर

हल्ल्याच्या दुसर्‍याच दिवशी सौम्या गुर्जर यांना राजस्थान सरकारने निलंबित केले. काही काँग्रेस नेतेही या निर्णयाच्या विरोधात आहेत. तर, भाजपही याला विरोध करीत आहे.

व्हायरल सीडीवरून राजाराम गुर्जर म्हणतात, की ही सीडी बनावट आहे. आम्ही कोणत्याही व्यवहाराबद्दल बोललो नाही. संघानं याबाबत कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. भाजप नेत्यांनीही या विषयावर मौन बाळगले आहे. परिवहन मंत्री प्रताप खाचरियावास म्हणाले आहेत की, सत्य जे काही असेल ते समोर येईल.

रेल्वे ट्रॅकवर करत होता बाईक स्टंट, अचानक आली ट्रेन आणि...; पाहा थरारक VIDEO

ही सीडी व्हायरल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वतःच याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीजी बीएल सोनी यांनी सांगितले की आम्ही गुन्हा नोंदविला असून या प्रकरणाचा तपास करत आहोत. सौम्या गुर्जर यांच्या निलंबन प्रकरणाची सुनावणी आज राजस्थान उच्च न्यायालयात होणार आहे. राजस्थान सरकारने यापूर्वीच कॅव्हेट दाखल केले होते.

Published by: Kiran Pharate
First published: June 11, 2021, 8:48 AM IST

ताज्या बातम्या