Home /News /national /

2 महिलांचं भाडणं झाल्यानंतर पुरुषही उतरले मैदानात, हाणामारीचा VIDEO समोर

2 महिलांचं भाडणं झाल्यानंतर पुरुषही उतरले मैदानात, हाणामारीचा VIDEO समोर

दोन्ही बाजूच्या महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला.

    सुरत, 12 मे : शाब्दिक वाद तुम्हाला कुठपर्यंत घेवून जाऊ शकतो, हे दाखवणारी सुरतमधील एक घटना समोर आली आहे. घरगुती कारणावरुन दोन महिलांचा वाद झाला. हा वाद आधी शाब्दिक हल्ल्यापर्यंत मर्यादित होता. नंतर मात्र दोन्ही बाजूच्या महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला. इमारतीत चाललेलं महिलांचं हे भांडण त्यांच्या कुटुंबापर्यंत जावून पोहोचलं. त्यानंतर दोन्ही कुटुंबातील पुरुषांनीही यात उडी घेतली. त्यामुळे वाद आणखीनच वाढला. मग काय थेट दोन्ही कुटुंब एकमेकांना भिडली. यात अनेकजण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे. हा सगळा प्रकार कळल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या