निवडणूक संपताच कथित गोरक्षकांची दादागिरी; महिलेसह 2 मुस्लीम तरुणांना मारहाण

गोमांस नेत असल्याच्या संशयावरून दोन मुस्लिम तरुणांसह महिलेला मारहाण करण्यात आली.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 12:52 PM IST

निवडणूक संपताच कथित गोरक्षकांची दादागिरी; महिलेसह 2 मुस्लीम तरुणांना मारहाण

भोपाळ, 25 मे : मध्य प्रदेशातील सिवनीमध्ये कथित गोरक्षकांची गुंडागिरी समोर आली आहे. रिक्षातून गोमांस नेत असल्याच्या संशायावरून महिलेसह 2 मुस्लिम तरूणांना लाठीकाठीनं मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. मुस्लिम तरूणांना मारहाण करणारा हा श्रीराम सेनेचा अध्यक्ष शुभम बघेल आहे. पोलिसांनी शुभम बघेलला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

रिक्षातून मांस नेत असताना शुभम बघेल आणि त्याच्या दोन साथीदारांनी महिला आणि दोन तरूणांकडे त्याबद्दल चौकशी केली. त्यानंतर रिक्षामध्ये मांस पाहिल्यानंतर गोमांस असल्याच्या संशयावरून महिलेसह तरूणांना मारहाण केली. यावेळी त्यांनी पोलिसांना कळवणं मात्र टाळलं. दोन दिवसापूर्वी ही घटना घडली आहे.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तरूणांना मारहाण करताना जय श्रीराम बोल अशा घोषणा देण्यास देखील सांगितलं आहे.  यावेळी तरूण आणि महिला आम्हाला सोडा अशी याचना देखील करत आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी गोळा झाली. पण, त्यांच्या मदतीला मात्र कुणीही पुढे आलं नाही.

MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विटरवरून नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.


VIDEO : महिलेनं बाळासह लोकलखाली मारली उडी; आश्चर्यकारकरित्या बचावलं बाळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 12:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...