Home /News /national /

VIDEO : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, लोकल ट्रेनची तोडफोड, रेल्वे स्थानकावर हल्ला

VIDEO : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, लोकल ट्रेनची तोडफोड, रेल्वे स्थानकावर हल्ला

पश्चिम बंगालमध्ये नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याच्या नावाने काही लोकांकडून अराजकतेचं राण पेटवलं गेलं.

    कोलकाता, 12 जून : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर देशभरात आंदोलने केली जात आहे. अनेकांकडून या घटनेवर निषेध व्यक्त केला जातोय. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याला निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील औरंगाबाद, सोलापूरसह अनेक शहरांमध्येही मोर्चे निघाले. पण या मोर्चांमध्ये शिस्त आणि शांतता पाळली गेली. कायद्याचं उल्लंघन होणार नाही, याची काळजी आंदोलकांकडून घेण्यात आली. पण पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) वेगळंच काहितरी बघायला मिळत आहे. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याच्या नावाने काही लोकांकडून अराजकतेचं राण पेटवलं जात आहे. संबंधित प्रकरणावरुन बंगालचा हावडा जिल्हा शांत होत असताना आज संध्याकाळी नदिया (Nadia) जिल्ह्यात हिंसाचाराने डोकंवर काढलं. या हिंसाचाराची ठिणगी रविवारी संध्याकाळी पडली आणि त्यानंतर त्याचा थेट वणवाच पेटला. या वणव्यात पश्चिम बंगालच्या बेथुआडहारी रेल्वे स्थानकाची (Bethuadhari railway station) अतिशय वाईट अवस्था झाली. अनेक प्रवासी जखमी झाले. लोकल ट्रेनच्या काचा फोडल्या. प्रचंड नासधूस, तोडफोड करण्यात आली. या घटनेचा ट्रेनच्या सेवेवरही दुष्परिणाम झाला. नेमकं काय घडलं? भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराची लाट उसळली आहे. बंगालच्या हावडा येथील परिस्थितीत सुधारत असताना आज नदिया जिल्ह्यात अनपेक्षित आणि प्रचंड भयानक घटना घडली. एका जमावाने आज लोकल ट्रेनवर दगडफेक केली. तसेच जिल्ह्यातील बेथुआडहारी रेल्वे स्थानकावर प्रचंड तोडफोड करण्यात आली. संबंधित घटना ही रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. जमावाने आज नदिया जिल्ह्यातील बेथुआडहारी रेल्वे स्थानकावर तोडफोड केली. या जमानाने अचानक रेल्वे स्थानकावर हल्ला केला. यावेळी लोकल ट्रेनची तोडफोड करण्यात आली. जमावाने रेल्वे स्थानकावर उभी राणाघाट-लालगोला लोकल ट्रेनवर हल्लाबोल करत प्रचंड तोडफोड केली. या ट्रेनमध्ये असलेले अनेक प्रवासी जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. प्रवाशी दहशतीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकावरील हल्ल्याच्या आधी हिंसाचार करणाऱ्यांनी बेथुआडहारी परिसरात रॅली काढली होती. त्यानंतर त्यांनी राजमार्ग 34 वर निदर्शने दिली. यावेळी पोलीस तिथे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आंदोलकांना तिथून हटवण्याचा प्रयत्न केला असता या जमावाची झुंड थेट रेल्वे स्थानकात घुसली आणि झुंडने प्रचंड तोडफोड केली. हल्लेखोरांनी यावेळी रेल्वे स्थानक जवळ आणि त्या परिसरातील दुकान, रुग्णालय आणि घरांनाही टार्गेट केलं, असा आरोप करण्यात येत आहे. हल्लेखोर प्रचंड वेगाने रेल्वे स्थानकात आले. त्यांनी तोडफोड केली. त्यानंतर ते तिथून पसार झाले. तोपर्यंत घटनास्थळी हवी तशी आरपीएफची फौज पोहोचू शकलेली नव्हती. या संपूर्ण प्रकारामुळे रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक पूर्णपणे गडबडलं. बराच वेळ रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्या आल्या नाहीत. त्यांना आधीच्या स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आलं.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या