S M L

काळे झेंडे दाखवले म्हणून कन्हैया कुमार समर्थकांनी पळवून पळवून मारलं

कन्हैया कुमारच्या प्रचार रॅलीला गोलबोट लागलं आहे.

Updated On: Apr 21, 2019 06:34 PM IST

काळे झेंडे दाखवले म्हणून कन्हैया कुमार समर्थकांनी पळवून पळवून मारलं

पाटना, 21 एप्रिल : लोकसभा निवडणुकीमध्ये लक्षवेधी लढतीतील प्रमुख लढत म्हणजे बिहारमधील बेगूसरायमधील होय. कारण, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना कन्हैया कुमारनं आव्हान दिलं आहे. यावेळी कन्हैया कुमारच्या प्रचाराला प्रतिसाद देखील मिळत आहे. पण, बेगुसरायमधील प्रचाराला गालबोट लागलं आहे. कन्हैया कुमारचे समर्थक प्रचार करत असताना त्यांना काळे झेंडे दाखवले गेले. त्यावेळी काहीशी बाचाबाची देखील झाली. त्यानंतर वादाचं रूपांतर पुढे हाणामारीत झालं. त्यानंतर कन्हैया कुमार समर्थकांनी काळे झेंडे दाखवणाऱ्यांना पळवून पळवून मारलं. पण, पोलिसांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला.


कुठे घडला प्रसंग?


गडपुरा परिसरातील सुजानपूर येथील कोरैय गावात सीपीआय उमेदवार कन्हैया कुमारची प्रचार रॅली पोहोचली. यावेळी गावातील काही तरूणांनी रॅलीला काळे झेंडे दाखवले. याचं रूपांतर वादात झालं. त्यानंतर कन्हैया कुमार समर्थकांनी पळवून पळवून या तरूणांना मारलं. शिवाय, काळे झेंडे दाखवणारे तरूण घरात घुसले. तिथं देखील त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.


लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्यांना लोक पराभूत करतील, पवारांची मोदींवर टीका

Loading...


बिग फाईट

दरम्यान, कन्हैया कुमारनं केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना आव्हान दिल्यानं लढतीत रंगत आली आहे. बेगुसरायमध्ये सीपीआयची ताकद देखील आहे. त्यामुळे बाजी कोण मारणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. देशात सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे निकाल हे 23 मे रोजी लागणार आहेत.


VIDEO : जवानाच्या लग्नाचा थाट भारी, हार घालताच केला हवेत गोळीबार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 06:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close