आक्षेपार्ह पोस्टमुळे भडकला हिंसाचार, गोळीबारात 2 ठार तर 60 पोलीस जखमी
बेंगळुरूच्या (Bengaluru Violence) काही भागात जातीय हिंसाचार (Communal Violence) भडकला. यानेळी गोळीबार देखील करण्यात आला. या गोळीबारात 2 जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
बंगळुरू, 12 ऑगस्ट : मंगळवारी रात्री उशिरा कर्नाटकची राजधानी बेंगळुरूच्या (Bengaluru Violence) काही भागात जातीय हिंसाचार (Communal Violence) भडकला. यानेळी गोळीबार देखील करण्यात आला. या गोळीबारात 2 जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 60 हून अधिक पोलीस जखमी झाल्याचं सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर बंगळुरुच्या पुलकेशी नगर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार (Congress MLA Srinivas Murthy) अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या नातेवाईकाने प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी सोशल मीडियावर एक अपमानास्पद पोस्ट पोस्ट शेअर केली होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकला.
ANI च्या वृत्तानुसार, ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी एकाच ठिकाणी येत कॉंग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर दगडफेक केली. यावेळी डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलीस ठाण्यावरही संतप्त नागरिकांनी दगडफेक केली. अनेक गाड्यांना आग लावण्यात आली तर हिंसाचार रोखण्यासाठी पुढे आलेल्या पोलिसांवरच दगड आणि बाटल्यांनी मारहाण करण्यात आली.
Congress MLA Srinivas Murthy's residence in Bengaluru vandalised, allegedly over an inciting social media post by his nephew. Karnataka Home Minister says, "Issue to be probed but vandalism is not the solution. Additional forces deployed. Action will be taken against miscreants." pic.twitter.com/Xa1q6SI6mG
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी मी आमदाराचा पुतण्या असल्याचं सांगणाऱ्या नवीन नावाच्या एका युवकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता माझं फेसबूक अकाऊंट हॅक झाली असल्याची माहिती त्याने दिली. मी कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट केली नसल्याचं नवीनने पोलिसांना सांगितलं.
Two people died in police firing, one injured shifted to a hospital. Restrictions under Section 144 of CrPC imposed in Bengaluru & curfew imposed in DJ Halli & KG Halli police station limits of the city: Bengaluru Police Commissioner Kamal Pant https://t.co/VlZKo8CW3d
बेंगळुरूचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात पोलिसांना गोळीबार करावा लागला. ज्यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह 60 पोलीस कर्मचारीही या हिंसाचारात जखमी झाले आहेत. त्यामुळे बेंगळुरूमध्ये सीआरपीसीचा कलम 144 लागू करण्यात आला आहे तर या प्रकरणी आतापर्यंत 110 लोकांना अटक करण्यात आली आहे.