आसाममधील धार्मिक तणावात 1 ठार; सैन्याला केलं पाचारण

आसाममधील धार्मिक तणावात 1 ठार; सैन्याला केलं पाचारण

आसाममधील हैलाकांडी जिल्ह्यात दोन समाजामध्ये वाद झाला आहे.

  • Share this:

दिसपूर, 11 मे : आसाममधील हैलाकांडी जिल्ह्यात उसळलेल्या धार्मिक तणावामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर, 14 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी परिस्थीतीवर नियंत्रण मिळवलं असून शांतात राखण्यासाठी आता सैन्याला पाचारण करण्यात आलं आहे. शुक्रवारी तणावग्रस्त भागात कर्फ्यु देखील लावण्यात आला आहे. 12 मे पर्यंत हा फर्क्यु कायम असणार आहे. मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्ये सार्वजनिक संपत्तीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला असण्याचा अंदाज आहे.


'भाजप म्हणजे राहू-केतूची खासगी कंपनी झाली आहे'

सैन्याची मदत

हैलाकांडी जिल्ह्यात मस्जिदच्या समोर नमाज पठण करण्यावरून दोन समाजामध्ये वाद झाला. त्यानंतर दोन्ही समजातील लोक परस्परांना भिडले. यामध्ये जवळपास 15 लोक जखमी झाले असून 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. यावेळी 15 पेक्षा जास्त वाहनांचं नुकसान करण्यात आलं. तर, 12 दुकानांची तोडफोड करण्यात आली. शिवाय, दुकानांना आग देखील लावण्यात आली. सध्या जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. परिस्थितीचा अंदाज पाहता आता सैन्याला देखील पाचारण करण्यात आलं आहे.


SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: assam
First Published: May 11, 2019 09:24 AM IST

ताज्या बातम्या